स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवायला येतेय Infinix Note 50 सिरीज, AI फीचर्स सपोर्टसह या दिवशी करणार एंट्री
स्मार्टफोन कंपनी Infinix त्यांना नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन अनेक नव्या AI फीचर्ससह लाँच केला जाणार असून त्याची एंट्री इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवणार आहे. नवीन स्मार्टफोन सिरीज Infinix Note 50 या नावाने लाँच केली जाणार आहे. स्मार्टफोन सिरीजचे काही स्पेसिपफिकेशन्स समोर आले आहेत. शिवाय कंपनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहीर केली आहे.
Oppo Smartphone launch: जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन लाँच, किंमत वाचून तुमचेही डोळे पाणावतील
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात Infinix Note 50 सीरीज लाँच केली जाणार आहे. आगामी स्मार्टफोन लाइनअप जवळजवळ एक वर्षापूर्वी लाँच करण्यात आलेल्या Infinix Note 40 मॉडेल्सची जागा घेईल. ही आगामी स्मार्टफोन सिरीज प्रथम इंडोनेशियामध्ये लाँच केली जाणार आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या टिझरमध्ये Infinix Note 50 सिरीजमधील एका हँडसेटच्या मागील कॅमेरा मॉड्यूलची झलक देखील पाहायला मिळत आहे. Infinix ने असेही उघड केले आहे की आगामी Infinix Note 50 सिरीज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वैशिष्ट्यांना समर्थन देईल. एकूणच आगामी स्मार्टफोन सिरीजमध्ये अनेक खास फीचर्स दिले जाणार आहेत.
कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे दिसत आहे की, स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर एका वेगळ्या डिझाईनमध्ये कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे. त्यामुळे स्मार्टफोन आकर्षक दिसत आहे. स्मार्टफोनचा लूक अतिशय स्टायलिश असणार आहे. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्मार्टफोनचा रंग जांभळा दिसत आहे.
कंपनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्टनुसार, Infinix Note 50 सिरीज सिरीजमधील स्मार्टफोन 3 मार्च रोजी इंडोनेशियामध्ये लाँच केले जाणार आहेत. कंपनीने प्लॅटफॉर्मवरील दुसऱ्या पोस्टमध्ये स्मार्टफोनच्या पदार्पणाची माहिती दिली होती. Infinix Note 50 सिरीजमध्ये किती मॉडेल्स लाँच केले जातील याबद्दल Infinix कडून कोणतीही माहिती नाही.
कंपनीच्या पोस्टनुसार, आगामी Infinix Note 50 सिरीज सिरीज AI कार्यक्षमतेसाठी समर्थन देईल. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपण Infinix Note 50 सिरीजचा मागील कॅमेरा मॉड्यूल देखील पाहू शकतो. स्मार्टफोन्सबद्दलची उर्वरित माहिती त्याच्या लाँचिंगच्या काही दिवस आधी जाहीर होण्याची शक्यता आहे.
सध्या, Infinix ने त्यांच्या आगामी स्मार्टफोन्सची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. एक नवीन मॉडेल – Infinix Note 50 प्रो – पूर्वी इंडोनेशियाच्या एसडीपीपीआय वेबसाइटवर मॉडेल क्रमांक X6855 सह सूचीबद्ध करण्यात आला होता. नियामकाच्या वेबसाइटवरील यादीमध्ये त्याचे कोणतेही तपशील उघड झाले नाहीत. मात्र यामुळे कंपनीच्या आगामी Infinix Note 50 सिरीजमधील एका मॉडेलची पुष्टी झाली आहे.
एप्रिल 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या Infinix Note 40 प्रो 5G चा उत्तराधिकारी म्हणून Infinix Note 50 प्रो लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्या हँडसेटमध्ये 6nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7020 चिप आणि 5,000mAh बॅटरी होती. त्यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.78 -इंचाचा वक्र 3D AMOLED डिस्प्ले होता. Infinix Note 40 प्रोमध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील होता.