आता TV च्या मोठ्या स्क्रिनवर पाहता येणार Reels! Instagram करतेय तयारी, एडम मोस्सेरी काय म्हणाले?
जगभरातील करोडो लोकं इंस्टाग्रामचा वापर करतात. सध्याच्या काळात लोकांमध्ये इंस्टाग्रामची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. इंस्टाग्राम केवळ मनोरंजनाचेच नाही तर कमाईचे देखील साधन बनले आहे. कंटेट क्रिएटर्स इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या विषयावरील व्हिडीओ अपलोड करून ब्रँड्सकडून चांगली कमाई करतात. काही व्हिडीओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ शिक्षणावर आधारित आहे. त्यामुळे प्रत्येक वयातील युजर्ससाठी इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स उपलब्ध असतात.
तुम्ही देखील इंस्टाग्रामचा वापर करता का? तुम्ही देखील इंस्टाग्रामवर सतत रिल्स पाहता का? तुम्ही देखील कधी असा विचार केला आहे का की या इंस्टाग्रामवरील रिल्स कधी मोठ्या स्क्रीनवर म्हणजेच टीव्हीवर पाहायची संधी मिळाली तर? खरतर कंपनी एक नवीन ॲप लाँच करण्याचा विचार करत आहे. हे ॲप स्मार्टफोनसाठी नाही तर स्मार्ट टीव्हीसाठी असणार आहे. ज्यामुळे युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनसोबतच त्यांच्या टीव्हीवर देखील इंस्टाग्राम रिल्स पाहता येणार आहेत. कंपनीने जर टीव्हीसाठी नवे इंस्टाग्राम ॲप लाँच केलं तर हे youtube साठी एक मोठं आव्हान ठरू शकतो. या सर्वांबाबत इंस्टाग्रामचे प्रमुख ऍडम मोसेरी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की कंपनी सध्या टीव्हीसाठी इंस्टाग्राम ॲप लाँच करण्याचा विचार करत आहे. ऑफिशियल याबाबत कोणतेही काम सुरू झालेल्या नाही. मात्र लवकरच हे सर्व सत्यात उतरण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोसेरी यांनी सांगितलं की, जर लोक टीव्हीवर कंटेंट पाहत असतील तर आम्हाला टीव्हीसाठी ॲप लॉन्च करावा लागेल. इंस्टाग्रामची इच्छा आहे की त्यांचा कंटेंट प्रत्येक डिवाइसवर दिसावा. त्यांनी असं देखील सांगितलं की, या ॲपवर लाईव्ह स्पोर्ट्स किंवा एक्सक्लुसिव शो दाखवले जाणार नाहीत. खरं तर आम्हाला हे ॲप या आधीच लाँच करायला पाहिजे होतं. यासाठी थोडा उशीरच झाला आहे. मात्र आता लवकरच टीव्हीसाठी देखील एक नवीन इंस्टाग्राम ॲप पाहायला मिळू शकतो.
Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका
याशिवाय भारतातील इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मबाबत देखील मोसेरी यांनी एक विधान केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, इंस्टाग्रामच्या वाढीसाठी भारत एक महत्त्वपूर्ण मार्केट आहे. जेव्हापासून टिकटॉक बंद झाला आहे, इंस्टाग्रामच्या युजर्स संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2020 मध्ये चीनसह झालेल्या सीमा वादानंतर भारत सरकारने टिकटॉकसह अनेक चीनी ॲप्स वर बंदी घातली. गेल्या काही वर्षात इंस्टाग्राममध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत आणि हे ॲप आता केवळ फोटोपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. इंस्टाग्रामवरती कंटेंट शेअर करून तगडी कमाई देखील केली जात आहे. आता, जागतिक बाजारपेठेत टिकटॉकला कडक स्पर्धा देण्यासाठी, ते लहान व्हिडिओंवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.