Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका
Samsung Galaxy M17 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन एक बजेट डिव्हाईस आहे. हा लेटेस्ट Samsung Galaxy M17 5G बजेट स्मार्टफोन कंपनीच्या बेस्ट सेलर Galaxy M16 5G ला रिप्लेस करणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हा फोन 15 हजार रुपयांच्या बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेला पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये नो-शेक कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत किती आहे आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.
Samsung च्या लेटेस्ट Galaxy M17 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1100 निट्स आहे. सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन इन-हाउस 6nm Exynos 1330 प्रोसेसरवर आधारित आहे. हा फोन 4जीबी, 6 जीबी आणि 8 जीबी तक रॅमसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Galaxy M17 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. हा कॅमेरा ब्लर फ्री फोटो आणि शेक फ्री व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. सॅमसंगच्या फोनमध्ये देण्यात आलेला प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. प्रायमरी कॅमेऱ्यासोबत कंपनीने अल्ट्रावाइड कॅमेरा आणि मॅक्रो कॅमेरा लेंस देखील दिले आहेत. सॅमसंगच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंगचा हा फोन Android 15 वर आधारित One UI 7 वर चालतो. कंपनीने सांगितलं आहे की, या लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनसाठी 6 ओएस अपडेट आणि 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट ऑफर केले जाणार आहे. सॅमसंगच्या या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Galaxy M17 5G मध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. हा फोन IP54 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मूनलाईट सिल्व्हर आणि सैफायर ब्लॅक या दोन रंगात लाँच केला आहे.
Galaxy M17 5G स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज, 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आणि 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11999 रुपये, 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13499 रुपये आणि 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14999 रुपये ठेवण्यात आली आहे. या सॅमसंग फोनची विक्री 13 ऑक्टोबरपासून सॅमसंग, सॅमसंगची वेबसाइट आणि प्रमुख स्ट्रॅटेजी स्टोअर्सवर सुरू होईल.