Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram चा गेम बदलणार! MUSE AI एजंटमुळे युजर्सना मिळणार नवा अनुभव, नेमकं काय आहे अपडेट जाणून घ्या…

Instagram: इन्स्टाग्रामच्या शेअर मेनूमध्ये MUSE नावाचा नवीन ऑप्शन दिसत असून तो मेटाचा AI एजंट म्हणून काम करणार आहे. हा फक्त माहिती देणारा चॅटबॉट नसून Action-Oriented AI Agent असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या हे फीचर भारतात उपलब्ध झालेले नाही आणि मेटाकडून त्याची हळूहळू टेस्टिंग सुरू आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 08, 2026 | 12:45 PM
Instagram चा गेम बदलणार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Instagram चा गेम बदलणार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Instagram शेअर मेनूमध्ये MUSE AI चा नवीन ऑप्शन दिसत आहे.
  • MUSE तिकीट, बुकिंग, रिमाइंडर आणि खर्चाच्या नियोजनात मदत करणार आहे.
  • हे फीचर सध्या भारतात उपलब्ध नसून मेटाकडून टेस्टिंग सुरू आहे.
Instagram MUSE AI Agent: इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. आता तुम्हाला इन्स्टाग्रामच्या शेअर मेनूमध्ये MUSE नावाचा एक नवीन ऑप्शन दिसत असेल. वरवर बघितलं तर वाटेल की हा पोस्ट शेअर करण्याचाच एक पर्याय नसून हा मेटाचा Meta एक नवीन AI एजंट आहे ज्याचा नाव MUSE असं ठेवलं आहे. तर हा तुमचा पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणार आहे. तुमची रोजची कामं तो चुटकीसरशी करून देणार आहे. Instagram

MUSE नेमकं काय काम करणार?

तुम्हाला फिरायला जायचंय आणि तिकीट काढायचंय? किंवा हॉटेल, रेस्टॉरंट बुक करायचंय? किंवा एखाद्या कामाचा रिमाइंडर लावायचा आहे? किंवा महिन्याचा खर्च कुठे झाला याचा हिशोब ठेवायचा आहे? ही सगळी कामं आता तुम्ही MUSE ला सांगू शकता आणि तो चॅटमध्येच ती पूर्ण करून देईल.याच्या आधीचे AI चॅटबॉट chatbox फक्त माहिती द्यायचे.

तुम्ही प्रश्न विचारला की उत्तर द्यायचे आणि विषय संपला. पण MUSE तसा नाही. हा Action-Oriented एजंट आहे. म्हणजे काय, तर तुमचं काम काय आहे हे तो आधी समजून घेतो, मग त्यासाठी लागणारा पूर्ण प्लॅन बनवतो आणि तो प्लॅन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत पण करतो. फक्त सांगून थांबत नाही, तर करून पण दाखवतो.

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल

इन्स्टाग्राममध्ये कसा दिसतो MUSE?

जेव्हा तुम्ही इन्स्टाग्रामवर एखादी रील किंवा पोस्ट शेअर करायला जाता, तेव्हा खाली जे ऑप्शन्स येतात तिथेच आता MUSE चं नाव दिसेल. त्यावर क्लिक केलं की मेटाच्या MUSE अॅपची लिस्ट ओपन होते. तिथे MUSE ला तुमचा पर्सनल AI एजंट म्हणून दाखवलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे फिचर अजून भारतामध्ये आलं नाही. फक्त ऑपश देण्यात आला मात्र मेन चॅटबॉक्स अजून आलं नाही. मेटा सध्या याची हळूहळू टेस्टिंग करत आहे. त्यामुळे सगळ्या युजर्सपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल.

तिकिटापासून ते बिलापर्यंत सगळं सांभाळणार

MUSE ची खासियत म्हणजे तो छोटी-छोटी पण वेळ खाणारी कामं सोपी करतो. समजा तुम्हाला ट्रेन किंवा फ्लाईटचं तिकीट बुक करायचं आहे. MUSE तुम्हाला तिकिटाच्या किमतीवर लक्ष ठेवायला मदत करेल आणि योग्य वेळी बुकिंग करायला सांगेल. तुम्हाला ईमेलवर एखादा फॉर्म आला असेल आणि तो कसा भरायचा कळत नसेल, तर MUSE तो फॉर्म भरण्यासाठी पण मदत करतो. इतकंच नाही तर तो तुम्हाला रिमाइंडर पण लावून देतो, त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम राहून जाणार नाही.

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

पैशाचा हिशोब पण ठेवणार

MUSE फक्त तिकीट बुकिंगच नाही तर तुमच्या पैशाचं नियोजन पण करणार आहे. तुम्ही महिन्याला कुठे किती खर्च करता याचा तो आढावा घेऊन देईल. तुमचे अनावश्यक खर्च कुठे होत आहेत हे तो शोधून काढेल. उदाहरणार्थ, तुमचे जर दोन-तीन ठिकाणी सब्सक्रिप्शन चालू असतील आणि त्यातले काही तुम्ही वापरत नसाल, तर कोणतं बंद केलं तर पैसे वाचतील हे MUSE सांगेल. पण शेवटी पैसे खर्च करायचा किंवा पेमेंट करायचा निर्णय हा तुमचाच असणार आहे. MUSE फक्त तुम्हाला योग्य सल्ला देईल.एकंदरीतच, MUSE मुळे इन्स्टाग्राम हे फक्त फोटो-व्हिडिओ बघण्याचं अॅप न राहता तुमच्या रोजच्या कामात मदत करणारा एक स्मार्ट पार्टनर बनणार आहे.

 

Web Title: Instagram muse ai agent personal assistant everyday tasks rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • instagram
  • instagram account
  • Meta AI

संबंधित बातम्या

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल
1

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.