Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय… यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट

Instagram New Feature: इंस्टाग्रामने एक नवीन फीचर रोलआऊट केलं आहे. या फीचरमध्ये यूजर्सना स्टोरी अपलोड केल्यानंतर देखील त्यामध्ये काही बदल करण्याचा पर्याय मिळणार आहे. मात्र हा पर्याय स्टोरी अपलोड केल्यानंतर 15 मिनिटांसाठी उपलब्ध असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 20, 2026 | 10:02 AM
काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय... यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट

काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय... यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्यानंतर देखील त्यामध्ये बदल करण्याचा पर्याय मिळणार
  • इंस्टाग्राम स्टोरी अपलोड केल्यानंतर यूजर्सना टेक्स्ट, म्यूजिक, स्टिकर आणि ड्रॉइंगमध्ये बदल करण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी मिळणार
  • विविध फोटो निवडण्याच्या प्रक्रियेत देखील बदल केला जात आहे
Instagram Update: सध्याच्या काळात तरूणांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. या नव्या फीचरमध्ये यूजर्सना इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्यानंतर देखील त्यामध्ये बदल करण्याचा पर्याय मिळणार आहे. यामुळे स्टोरी पोस्ट करताना जर काही चुकले तर, तुम्हाला तीच स्टोरी डिलीट करून पुन्हा अपलोड करण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजेच एडीट केल्यानंतर देखील स्टोरीवरील व्ह्युज, लाईक्स आणि रिप्लाय सुरक्षित राहणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. हे फीचर कसं काम करणार याबाबत आता जाणून घेऊया.

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स… जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

कसं काम करणार नवं इंस्टाग्राम फीचर?

इंस्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनी सांगितलं आहे की, स्टोरी अपलोड केल्यानंतर यूजर्सना टेक्स्ट, म्यूजिक, स्टिकर आणि ड्रॉइंगमध्ये बदल करण्याचा पर्याय मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवा की, यूजर्ससाठी हा पर्याय केवळ 15 मिनिटे उपलब्ध असणार आहे. याचा अर्थ असा आहे की, इंस्टाग्राम स्टोरी अपलोड केल्यानंतर यूजर्सना टेक्स्ट, म्यूजिक, स्टिकर आणि ड्रॉइंगमध्ये बदल करण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. ज्या यूजर्सना स्टोरी अपलोड केल्यानंतर त्यामध्ये काही चुकले आहे, असे वाटते त्यांच्यासाठी हे फीचर फायद्याचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

इंस्टाग्राम स्टोरी एडीट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

लक्षात ठेवा की, स्टोरी अपलोड केल्यानंतर केवळ 15 मिनिटांसाठी टेक्स्ट, म्यूजिक, स्टिकर आणि ड्रॉइंगमध्ये बदल करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम ओपन करा आणि तुम्ही अपलोड केलेल्या स्टोरीवर क्लिक करा. आता खालील बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट मेन्यूवर क्लिक करा. इथे तुम्हाला एडीट पर्याय दिसेल त्याची निवड करा. आता तुम्ही स्टोरीमधील टेक्स्ट, म्यूजिक, स्टिकर आणि ड्रॉइंगमध्ये तुमच्या पसंतीनुसार बदलू शकता.

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय

तसेच, इंस्टाग्राम स्टोरीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी स्टिकरमध्ये नवीन फाँट, रंग आणि आकार जोडत आहे. स्टिकरसाठी वेगवेगळ्या शीट्स देखील उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे यूजर्स अगदी सहज त्यांच्या पसंतीनुसार स्टिकरची निवड करू शकतात. तसेच, विविध फोटो निवडण्याच्या प्रक्रियेत देखील बदल केला जात आहे. यासोबतच नवीन ब्लर इफेक्ट, रंग आणि ग्रेडिएंट बॅकग्राउंड देखील जोडले जाणार आहे. या सर्व बदलांमुळे कंटेट क्रिएशन अधिक क्रिएटिव्ह आणि मजेदार होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंस्टाग्रामचे नवीन फीचर काय आहे?

    Ans: इंस्टाग्रामच्या नवीन फीचरमुळे यूजर्सना स्टोरी पोस्ट केल्यानंतरही त्यामध्ये एडिट करता येणार आहे.

  • Que: इंस्टाग्राम स्टोरी किती वेळ एडिट करता येणार आहे?

    Ans: स्टोरी अपलोड केल्यानंतर केवळ 15 मिनिटांपर्यंत एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

  • Que: इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कोणते बदल करता येणार आहेत?

    Ans: यूजर्स स्टोरीमधील टेक्स्ट, म्युझिक, स्टिकर्स आणि ड्रॉइंगमध्ये बदल करू शकणार आहेत.

Web Title: Instagram rollout new edit story feature know how it works hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Charger Switch Left On? मोबाईल चार्जिंगला नसतानाही स्विच सुरू ठेवता? सावधान! होऊ शकते मोठे नुकसान
1

Charger Switch Left On? मोबाईल चार्जिंगला नसतानाही स्विच सुरू ठेवता? सावधान! होऊ शकते मोठे नुकसान

Rudransh Thakur Viral Video : एवढ्या लहान वयात एवढा स्वॅग! रुद्रांशच्या स्टाईलने इंटरनेटवर घातला धुमाकूळ
2

Rudransh Thakur Viral Video : एवढ्या लहान वयात एवढा स्वॅग! रुद्रांशच्या स्टाईलने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

Google Drive ला टक्कर देणार! WhatsApp आणतंय भन्नाट फीचर, चॅट्सचा बॅकअप घेण्याची पद्धत बदलणार
3

Google Drive ला टक्कर देणार! WhatsApp आणतंय भन्नाट फीचर, चॅट्सचा बॅकअप घेण्याची पद्धत बदलणार

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय
4

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.