छोट्या क्रिएटर्सना Instagram चा झटका! Live -स्ट्रीमिंगमध्ये केला महत्त्वपूर्ण बदल, युजर्सना पूर्ण करावी लागणार 'ही' अट
Instagram Live: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने त्यांच्या लाईव्ह स्ट्रिमिंग फीचरमध्ये एक मोठा बदल केला आहे. हा बदल कंटेट क्रिएटर्सच्या जीवनावर मोठा परिणाम करणार आहे. इंस्टाग्रामने एक नवीन नियम जारी केला आहे. ज्या कंटेट क्रिएटर्सना आता इंस्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची इच्छा असेल त्यांना 1 हजार फॉलोवर्स पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता केवळ हेच युजर्स लाईव्ह येऊ शकणार आहेत, ज्यांच्याकडे कमीत कमी 1 हजार फॉलोवर्स असणार आहेत.
Google वर लीक झाले ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट! तुमच्या संभाषणाचाही समावेश आहे का? असं करा चेक
कंपनीची ही नवीन पॉलिसी अलीकडेच भारतात लाँच करण्यात आली आहे. नवीन DM आणि ब्लॉकिंग सुविधेनंतर आता लाईव्ह स्ट्रिमिंग पॉलिसीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. ज्या युजर्सचे फॉलोवर्स 1000 पेक्षा कमी आहेत, ते आता लाईव्ह येऊ शकणार आहे. मात्र असे युजर्स व्हिडीओ कॉलिंगद्वारे इतर युजर्ससोबत आणि त्यांच्या फॉलोवर्ससोबत कनेक्ट होऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्रामच्या या नव्या नियमाचा परिणाम छोट्या कंटेट क्रिएटर्सवर होणार आहे. असे काही कंटेट क्रिएटर्स असतात जे लाईव्ह जाऊन फॉलोवर्स वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता अशाच कंटेट क्रिएटर्ससाठी एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे. या नवीन नियमांनुसार, आता ज्या कंटेट क्रिएटर्सचे 1000 पेक्षा कमी फॉलोवर्स आहेत ते कंटेट क्रिएटर्स लाईव्ह येऊ शकणार नाहीत. ज्यांना लाईव्ह यायचं असेल त्यांना 1000 फॉलोवर्स पूर्ण करावे लागणार आहेत. कंपनीने या बदलाचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही, परंतु असे मानले जाते की हे पाऊल संसाधने वाचवण्यासाठी आणि सिस्टम हलके ठेवण्यासाठी उचलले गेले आहे कारण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये जास्त सर्व्हर आणि डेटा वापरला जातो.
अनेक युजर्सचं असं म्हणणं आहे की, इंस्टाग्रामने घेतलेला हा निर्णय आक्षेपार्ह कंटेंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न असू शकतो. आक्षेपार्ह किंवा अश्लील लाईव्ह कंटेट रोखण्यासाठी इंस्टाग्रामने हा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या यूजरला या प्रकारच्या कंटेंटसाठी बंदी घातली गेली, तर त्याला पुन्हा लाईव्ह होण्यासाठी 1000 फॉलोअर्स मिळवावे लागतील.
इंस्टाग्रामचे हे पाऊल इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच आहे. उदाहरणार्थ, YouTube वर लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी किमान 50 सबस्क्राइबर्सची आवश्यकता असते, तर TikTok वर किमान 1,000 फॉलोअर्सची आवश्यकता असते.
यासोबतच, इंस्टाग्रामने किशोरवयीन यूजर्ससाठी डीएम विभागात दोन नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये देखील लाँच केली आहेत. आता जेव्हा एखादा किशोरवयीन व्यक्ती एखाद्याशी चॅट सुरू करतो, जरी ते दोघेही एकमेकांना फॉलो करत असले तरीही, इंस्टाग्राम त्यांना काही सुरक्षा टिप्स दाखवेल. हे तुम्हाला इतर यूजर्सचे प्रोफाइल काळजीपूर्वक पाहण्यास आणि वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी विचार करण्यास सांगतील.
भारतात इंस्टाग्रामचे किती अॅक्टिव्ह युजर्स आहेत?
392.465 मिलीयन
लाईव्ह येण्यासाठी इंस्टाग्रामवर किती फॉलोवर्स गरजेचे?
1000 फॉलोवर्स
इंस्टाग्रामवर नवीन नियम का गरजेचा?
आक्षेपार्ह कंटेंट ब्लॉक करण्यासाठी