मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा
Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स
आता ॲप स्टोअरवर इंस्टाग्राम ॲप ॲपल टिव्हीसाठी देखील उपलब्ध करण्यात आले आहे. यापूर्वी इंस्टाग्राम ॲपच्या लिस्टिंगमध्ये केवळ आयफोन आणि आयपॅडसाठी सपोर्ट देण्यात आला होता. या लिस्टिंगमध्ये ॲपल टिव्हीचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता कंपनीने ॲपल टिव्हीसाठी देखील इंस्टाग्राम ॲप जारी केले आहे. त्यामुळे आता यूजर्स ॲपल टिव्हीवर इंस्टाग्राम डाऊनलोड करून मोठ्या स्क्रीनवर रिल्स पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.
यूजर्स हे ॲप मोफत डाऊनलोड करू शकतात. तसेच यामध्ये इन-ॲप खरेदीचा पर्याय देखील देण्यात आला आहे. लक्षात ठेवा की, मोठ्या स्क्रीनवर इंस्टाग्राम पाहण्यासाठी ॲपल टिव्हीमध्ये tvOS 26.0 किंवा नवीन सॉफ्टवेयर वर्जन असणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
टिव्हीवर इंस्टाग्रामचा अनुभव केवळ छोट्या व्हिडीओंपुरता मर्यादित राहणार नाही. तर यूजर्स त्यांच्या आवडत्या क्रिएटर्सचे व्हिडीओ पाहू शकतात आणि त्यांच्या आवडीनुसार कंटेट शोधू शकणार आहेत. ॲपमध्ये रिल्सव्यतिरिक्त मोठे व्हिडीओ आणि लाईव्ह शो पाहण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. यामध्ये असे देखील एक फीचर आहे की, यूजर्स दुसऱ्या डिव्हाईसवर पाहत असलेला अपूर्ण व्हिडीओ देखील टिव्हीवर पाहू शकणार आहेत.
मेटाने डिसेंबर 2025 मध्ये ॲमेझॉन फायर टीव्ही डिव्हाईसवर इंस्टाग्राम सपोर्ट ऑफर करत चाचणी सुरु केली होती. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये गूगल टिव्ही आणि जून 2026 मध्ये सॅमसंग स्मार्ट टिव्हीसाठी देखील इंस्टाग्राम ॲपचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर आता कंपनीने ॲपल टिव्हीसाठी देखील इंस्टाग्राम ॲप उपलब्ध केले आहे.
ॲपल टिव्हीसाठी इंस्टाग्राम ॲप उपलब्ध करत मेटाने त्यांचे व्हिडीओ प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर एकट्याने रिल्स पाहण्याऐवजी यूजर्सना टिव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर मित्र आणि कुटूंबासोबत रिल्स पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.
Ans: होय, इंस्टाग्राम ॲप ॲपल टिव्हीसाठी उपलब्ध झाल्यामुळे यूजर्सना मोठ्या स्क्रीनवर Reels, व्हिडीओ आणि लाइव्ह शो पाहता येणार आहेत.
Ans: ॲपल टिव्ही वरील App Store उघडा, इंस्टाग्राम ॲप शोधा आणि उपलब्ध असल्यास ते डाउनलोड करा.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, ॲपल टिव्हीमध्ये tvOS 26.0 किंवा त्यापेक्षा नवीन सॉफ्टवेअर व्हर्जन असणे आवश्यक आहे.






