Vijay Deverakonda Unfollows Rashmika: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
साऊथची सगळ्यात लाडकी जोडी म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. या दोघांच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. आणि अखेर 26 फेब्रुवारीला राजस्थानच्या उदयपूरमध्ये या दोघांनी शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या कुटुंबातले लोक, जवळचे मित्र या लग्नाला हजर होते. लग्नाचे फोटो आल्यावर चाहत्यांनी तर प्रेमाचा वर्षावच केला होता. लोक त्यांना प्रेमाने ‘विरोश’ म्हणतात.
लग्नानंतर दोघे ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पण गेले होते. तिथे त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या होत्या. सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक सोशल मीडियावर एका बातमीने खळबळ उडवली.
विजय देवरकोंडा विरुद्ध अर्नोल्ड व्हॉसलू! ‘राणाबली’चा 16 दिवसांत शूट …
सोशल मीडियावर काही पेजेसनी दावा केला की विजय देवरकोंडाने लग्नाच्या काही महिन्यातच रश्मिकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. चाहत्यांना तर धक्काच बसला. लग्न होऊन काही महिनेच झाले आणि हा काय प्रकार आहे? दोघांमध्ये भांडण झालं का? दुरावा आला का? असे अनेक प्रश्न लोक विचारू लागले. ट्विटर, इंस्टावर याच गोष्टीची चर्चा सुरू झाली. नेटकऱ्यांनी त्यांच्या नात्यांमध्ये काहीतरी खूरघुडी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. Vijay Deverakonda Unfollows Rashmika:
जेव्हा या बातमीची सत्यता तपासली गेली, तेव्हा वेगळंच सत्य समोर आलं. विजय देवरकोंडाने रश्मिकाला अनफॉलो केलेलं नाहीच. खरं तर विजय देवरकोंडा इंस्टाग्रामवर कोणालाच फॉलो करत नाही. त्याच्या फॉलोइंग लिस्टमध्ये 0 आकडा आहे. तो आधीपासूनच कोणालाही फॉलो करत नाही. मग रश्मिकाला अनफॉलो करण्याचा प्रश्नच येत नाही.
Vijay Deverakonda:’१०० वेळा लग्नासाठी विचारलं.’, विजयच्या वक्तव्याचा …
त्याच्या लिस्टमध्ये रश्मिकाचं नाव नाही, कारण तो कोणालाच फॉलो करत नाही. ही त्याची जुनी सवय आहे. त्यामुळे ‘विजयने रश्मिकाला अनफॉलो केलं’ हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि अफवा आहे. दुसरीकडे रश्मिका मात्र विजयला आणि त्याच्या घरच्या काही लोकांना फॉलो करते. ती अजूनही त्याचे फोटो लाईक करते, कमेंट करते.
आजकाल सोशल मीडियावर कोणी कोणाला फॉलो केलं, अनफॉलो केलं यावरून लोक लगेच नात्याबद्दल जज करतात. पण हे चुकीचं आहे. कोणाला फॉलो करणं, न करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
विजय आणि रश्मिका दोघेही खुश आहेत. त्यांचं लग्न झालंय आणि ते त्यांच्या कामात बिझी आहेत. एका फेक बातमीवरून त्यांच्यात दुरावा आला असं म्हणणं चुकीचं ठरेल.त्यामुळे चाहत्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. ‘विरोश’ जोडी एकदम मजेत आहे आणि लवकरच दोघे एकत्र एखाद्या सिनेमात दिसतील अशी आशा चाहत्यांना आहे.






