Instagram युजर्सना मिळाला ट्रिपल धमाका! कंपनी घेऊन आली 3 नवे फीचर्स, आता अॅप वापरताना येणार आणखी मजा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचे करोडो युजर्स आहेत. या सर्व युजर्सच्या अनुभव अधिक चांगला व्हावा त्यांना अॅप वापरताना कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते आणि नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. तुम्ही देखील इंस्टाग्राम वापरताय का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने पुन्हा एकदा त्यांच्यासाठी यूजर्ससाठी एक दोन नाही तर तब्बल तीन फीचर्स आणले आहेत.
मेटाने त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अधिक इंटरऍक्टिव्ह आणि सोशल बनवण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी कंपनीने तीन नवे फीचर्स रिलीज केले आहेत. या फिचर्समध्ये पोस्ट आणि रिल्स रिपोस्ट, रिल्समध्ये नवं फ्रेंड्स टॅब आणि स्नॅपचॅटप्रमाणे लोकेशन बेस्ट मॅप यांचा समावेश आहे. हे तीन फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहेत. या तीन फीचरच्या मदतीने इंस्टाग्राम तुम्हाला तुमच्या सर्कलसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिल्समधील फ्रेंड्स टूलच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांनी लाईक आणि कमेंट केलेले रिल्स पाहू शकता. या नव्या फीचर्समुळे युजरचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. त्यांना त्यांच्या मित्रांनी लाईक आणि कमेंट केलेले रिल्स पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच एखादी रील युजर्सना आवडली ते ती रिल रिपोस्ट देखील करू शकतात. या तिन्ही फीचर्सबाबत सविस्तर जाणून घेऊया.
इंस्टाग्रामने एक नवं फिचर ॲड केला आहे जे अगदी स्नॅपचॅटमधील मॅपप्रमाणे काम करते. या फीचरमुळे युजर्सना समजते की त्यांच्या फ्रेंड्सने किंवा ते फॉलो करत असलेल्या क्रिएटर्सने कोणत्या ठिकाणाहून पोस्ट शेअर केली आहे. तसेच तुम्ही तुमचे लास्ट ऍक्टिव्ह लोकेशन देखील शेअर करू शकता. खरं तर आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेली लोकेशन सर्विस सहसा बंदच असते. त्यामुळे तुम्ही ही सर्विस चालू किंवा बंद करून इंस्टाग्राममधील मॅप फीचरचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला कोणासोबत लोकेशन शेअर करायचे आहे हे देखील तुम्ही ठरवू शकता.
नव्या अपडेटनंतर आता इंस्टाग्राम युजर्सना त्यांच्या प्रोफाईलवर पब्लिक रिल्स आणि पोस्ट रिपोस्ट करण्याची सुविधा देतात. लाईक, शेअर आणि कमेंट दरम्यान तुम्हाला हे ऑप्शन पाहायला मिळेल. ज्यावर क्लिक करताच तुम्ही संबंधित पोस्ट किंवा रिल रिपोस्ट करू शकता. रिपोस्ट करताना तुम्ही यामध्ये एक छोटी कॉमेंट किंवा नोट देखील ऍड करू शकता.
ब्लूटूथ हेडफोनमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? टेक फ्रेंडली युजर्समध्ये निर्माण झालाय गोंधळ! काय आहे सत्य?
गेल्या काही काळापासून इंस्टाग्राममध्ये एक नवं फीचर जोडण्यात आलं आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मित्रांनी लाईक केलेली रिल हार्टशेप मध्ये दिसत होते. पण आता या फीचरमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तुम्हाला रिल्स पाहताना वरच्या बाजूला रिल्स आणि फ्रेंड्स असे दोन ऑप्शन पाहायला मिळतील. फ्रेंड्सवर क्लिक करताच तुमच्या मित्रांनी लाईक आणि कमेंट केलेले रिल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सुरू असलेला ट्रेडिंग कंटेंट पाहू शकता.