Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Charger Switch Left On? मोबाईल चार्जिंगला नसतानाही स्विच सुरू ठेवता? सावधान! होऊ शकते मोठे नुकसान

Charger Switch Left On? मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंग झाल्यानंतर चार्जरचा स्विच सुरूच ठेवण्याची सवय तुमच्या वीजबिलात वाढ करू शकते. स्विच चालू असल्यास चार्जर उपकरण जोडलेले नसतानाही काही प्रमाणात वीज वापरतो. याला फँटम लोड किंवा व्हॅम्पायर ड्रॉ असे म्हणतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 19, 2026 | 04:30 PM
Charger Switch Left On? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Charger Switch Left On? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

घरात लाईट बिल बघून सगळ्यांनाच घाम फुटतो. बिल जास्त आलं की आपण म्हणतो, फ्रिज जास्त चाललाय, एसी जास्त लावलाय. पण कधी कधी चोर घरातच असतो. तो चोर म्हणजे आपला चार्जर.बऱ्याच घरात अशी सवय असते. फोन चार्जिंगला लावला, 100% झाला की फोन उचलून घेतला, पण प्लग तसाच बोर्डात ठेवला. स्विच पण बंद केला नाही. लॅपटॉपचं पण तेच. काम झालं की लॅपटॉप बंद केला, पण त्याचा अडॅप्टर रात्रभर बोर्डातच. आपल्याला वाटतं, फोन नाहीये तर वीज कशी जाणार? पण वीज जातेच. Charger Switch Left On?

स्विच चालू म्हणजे वीज चालू

बोर्डातला स्विच चालू असेल तर चार्जर आतून वीज ओढतच राहतो. त्याला काही जोडलेलं नसलं तरी तो गपचूप वीज पित असतो. इंग्रजीत याला फँटम लोड किंवा व्हॅम्पायर ड्रॉ म्हणतात. म्हणजे भूतासारखी वीज. दिसत नाही, पण बिलात दिसते.साधं उदाहरण घ्या. तुम्ही नळ बंद केला नाही तर पाणी थेंब थेंब गळत राहतं. दिवसभरात बादली भरते. तसंच इथे पण आहे. एक चार्जर थोडी वीज घेतो, पण घरात 3-4 चार्जर, एक टीव्हीचा प्लग, एक वायफायचं राऊटर, एक स्पीकर… सगळे मिळून दिवस रात्र वीज खातात.

BSNL New Plans: दोन SIM वापरणाऱ्यांची चिंता मिटली! BSNL चे ‘हे’ तीन स्वस्त व्हॉइस प्लॅन लॉन्च

किती नुकसान होतं?

एका चार्जरचा हिशोब केला तर तो 0.1 ते 0.5 वॅट वीज घेतो. ऐकायला खूप कमी वाटतं. पण 24 तास, 30 दिवस याचा गुणाकार केला तर आकडा मोठा होतो. तज्ज्ञ सांगतात, अशा फुकट जाणाऱ्या विजेमुळे घराच्या एकूण विजेच्या 5 ते 10 टक्के वीज वाया जाते. म्हणजे 1000 रुपयांच्या बिलात 50 ते 100 रुपये असेच जातात. जर घरात जास्त उपकरणं असतील तर महिन्याच्या शेवटी 200 ते 500 रुपये जास्त बिल येऊ शकतं. वर्षाचा हिशोब केला तर 2400 ते 6000 रुपये फक्त या निष्काळजीपणामुळे जातात. विचार करा, तेवढ्या पैशात महिन्याचा किराणा येईल.मग काय करायचं?हे काही मोठं काम नाहीये. फक्त एक सवय लावायची आहे.

  • फोन चार्ज झाला की चार्जर सकट प्लग काढून ठेवा.
  • रात्री झोपताना सगळे बोर्ड चेक करा.
  • टीव्ही, चार्जर, लॅपटॉपचे स्विच बंद आहेत का बघा.
  • एकच बोर्ड वापरत असाल तर एक्सटेन्शन बोर्ड घ्या, ज्यात एकच मुख्य स्विच असतो.
  • एक बटण बंद केलं की सगळं बंद.
  • लहान मुलांना पण ही सवय लावा. ते पण फोन काढून स्विच बंद करायला शिकतील.
How to Use an Old Smartphone: कपाटात पडलेल्या जुन्या मोबाईलचा करा स्मार्ट वापर! 3 भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क

आजकाल मोबाईल, लॅपटॉप शिवाय कुणाचं चालत नाही. 12-13 तास ते चालूच असतात. त्यामुळे चार्जिंग तर करावंच लागणार. पण चार्जिंग झाल्यावर स्विच बंद करणं हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे पुढच्या वेळी फोन काढताना फक्त फोन काढू नका, स्विच पण बंद करा. ही छोटीशी सवय तुमचे महिन्याला 200-500 रुपये वाचवेल. आणि लाईट बिल बघून धक्का पण बसणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चार्जरला मोबाईल जोडलेला नसतानाही वीज खर्च होते का?

    Ans: होय. स्विच सुरू असल्यास काही चार्जर उपकरण जोडलेले नसतानाही थोड्या प्रमाणात वीज वापरतात.

  • Que: फँटम लोड म्हणजे काय?

    Ans: उपकरण वापरात नसतानाही ते प्लगला जोडलेले आणि स्विच सुरू असल्यामुळे होणाऱ्या वीज वापराला फँटम लोड म्हणतात.

  • Que: व्हॅम्पायर ड्रॉ म्हणजे काय?

    Ans: उपकरणे बंद किंवा निष्क्रिय असतानाही होणाऱ्या अनावश्यक वीज वापराला व्हॅम्पायर ड्रॉ म्हणतात.

Web Title: Charger switch left on electricity bill saving tips phantom load rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • electricity
  • Light Bill
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

Higher Education Report: उच्च शिक्षणात मोठी क्रांती! ‘या’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा वाटा ६२ टक्क्यांवर; अहवालातून खुलासा
1

Higher Education Report: उच्च शिक्षणात मोठी क्रांती! ‘या’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा वाटा ६२ टक्क्यांवर; अहवालातून खुलासा

Saudi Arabia News : इराण युद्धामुळे सौदीचे क्राउन प्रिन्स संकटात; अर्थव्यवस्थेला मोठा फटका
2

Saudi Arabia News : इराण युद्धामुळे सौदीचे क्राउन प्रिन्स संकटात; अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Indapur News : तहसीलदारांच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय एल्गार; २५ नोव्हेंबरला इंदापुरात भव्य मोर्चा
3

Indapur News : तहसीलदारांच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय एल्गार; २५ नोव्हेंबरला इंदापुरात भव्य मोर्चा

Gaming News : १३ वर्षाची प्रतीक्षा संपली; GTA ६ अखेर गेमर्सच्या भेटीला जगातील सर्वात महागड्या गेमची चर्चा
4

Gaming News : १३ वर्षाची प्रतीक्षा संपली; GTA ६ अखेर गेमर्सच्या भेटीला जगातील सर्वात महागड्या गेमची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.