Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Drive ला टक्कर देणार! WhatsApp आणतंय भन्नाट फीचर, चॅट्सचा बॅकअप घेण्याची पद्धत बदलणार

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲपवर लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. हे फीचर रोलआऊट झाल्यानंतर चॅट हिस्ट्री स्टोअर करण्यासाठी पात्र यूजर्सना व्हॉट्सॲप नेटिव्ह क्लाऊड स्टोरेजवर किंवा गूगल ड्राईव्ह असे दोन पर्याय मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2026 | 12:13 PM
Google Drive ला टक्कर देणार! WhatsApp आणतंय भन्नाट फीचर, चॅट्सचा बॅकअप घेण्याची पद्धत बदलणार

Google Drive ला टक्कर देणार! WhatsApp आणतंय भन्नाट फीचर, चॅट्सचा बॅकअप घेण्याची पद्धत बदलणार

Follow Us
Follow Us:
  • चॅट्सचा बॅकअप थेट WhatsApp च्या क्लाउडवर सेव्ह करता येणार
  • WhatsApp मध्ये मोठा बदल होणार!
  • निवडक अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी नेटिव क्लाऊड बॅकअप स्टोरेजची चाचणी सुरु
व्हॉट्सॲप सध्या एका अशा बॅकअप फीचरवर काम करत आहे, जे यूजर्सना त्यांचे चॅट्स थेट व्हॉट्सॲपच्या क्लाऊड स्टोरेजवर बॅकअप घेण्याची सुविधा देणार आहे. अँड्रॉईडवर निवडक बीटा टेस्टर्ससाठी या फीचरची चाचणी सुरु करण्यात आली आहे. हे फीचर रोलआऊट झाल्यानंतर पात्र यूजर्सना त्यांची चॅट हिस्ट्री व्हॉट्सॲपच्या नेटिव्ह क्लाऊड स्टोरेजवर किंवा गूगल ड्राईव्हवर अपलोड करण्याचा पर्याय मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सॲप 2GB फ्री स्टोरेज ऑफर करते आणि पेड यूजर्स जास्तीचे क्लाऊड स्टोरेज खरेदी करू शकतात. व्हॉट्सॲपच्या नेटिव्ह क्लाऊड स्टोरेजवर स्टोअर करण्यात आलेले चॅट्स डिफॉल्ट स्वरुपात एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहेत.

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स… जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

नेटिव क्लाऊड बॅकअप स्टोरेज

WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप सध्या निवडक अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी नेटिव क्लाऊड बॅकअप स्टोरेजची चाचणी करत आहे. असं सागितलं जात आहे की, हे फीचर अँड्रॉईड वर्जन 2.26.46.4 च्या व्हॉट्सॲप बीटा वर्जनमध्ये पाहायला मिळाले आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

कॉम्प्लिमेंट्री क्लाउड स्टोरेज

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सॲप 2GB कॉम्प्लिमेंट्री क्लाउड स्टोरेज देते. तर ज्या यूजर्सना जास्त स्टोरेजची आवश्यकता असते, असे यूजर्स व्हॉट्सॲप प्लस सब्सक्रिप्शनद्वारे हायर टियर्सची निवड करू शकता, ज्यामध्ये 100GB स्टोरेज मिळते. तर, यापेक्षा अधिक स्टोरेजची आवश्यकता असल्यास यूजर्स 4TB पर्यंत स्टोरेज एलोकेशनसह मेटा वन सब्सक्रिप्शनचा वापर करू शकतात. भारतात व्हॉट्सॲप प्लस प्लॅनची किंमत 79 रुपये प्रति महीना आहे, तर मेटा वन कोअर प्लॅनची किंमत 549 रुपये प्रति महीना आहे.

ॲक्टिव्ह सबस्क्रिप्शन

व्हॉट्सॲप क्लाऊड ॲक्सेस करण्यासाठी यूजर्सना एक ॲक्टिव्ह सबस्क्रिप्शन सुरु ठेवावे लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सबस्क्रिप्शन संपल्यानंतर व्हॉट्सॲप त्यांच्या सर्वरवर लेटेस्ट बॅकअप चार महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवणार आहे. यूजर्सनी जर 4 महिन्यांपर्यंत त्यांचे सबस्क्रिप्शन रिन्यू केले नाही, तर हे स्टोरेज कायमस्वरुपी डिलीट केले जाणार आहे.

रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, व्हॉट्सॲपच्या कस्टम क्लाउड स्टोरेजवर अपलोड करण्यात आलेला डेटा डिफॉल्ट स्वरुपात एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे. जर यूजर्सना व्हॉट्सॲप क्लाऊड स्टोरेजचा वापर सुरु ठेवायचा असेल तर सबस्क्रिप्शन बंद केले जाऊ शकत नाही. तसेच, ज्या यूजर्सना अनएन्क्रिप्टेड बॅकअप पाहिजे आहे, असे यूजर्स गूगल ड्राइव्ह किंवा आयक्लाउडसारख्या स्टँडर्ड क्लाउड प्रोव्हायडर्सचा वापर करू शकतात.

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय

कस्टम पासवर्ड, पासकी किंवा 64-डिजिटच्या एन्क्रिप्शन की

अकाऊंटची सुरक्षा वाढवण्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूजर्सना कस्टम पासवर्ड, पासकी किंवा 64-डिजिटच्या एन्क्रिप्शन की चा वापर करून नेटिव्ह क्लाऊड बॅकअप लॉक करण्याची सुविधा देतात. असं सांगितलं जात आहे की, व्हॉट्सॲप क्लाऊड स्टोरेज सध्या काही निवडक यूजर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर लवकरच iOS बीटा यूजर्ससाठी देखील रोलआऊट केले जाण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp चे नवीन क्लाऊड बॅकअप फीचर काय आहे?

    Ans: व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरमुळे यूजर्सना त्यांच्या चॅट्सचा बॅकअप थेट व्हॉट्सॲपच्या स्वतःच्या क्लाऊड स्टोरेजवर घेता येणार आहे.

  • Que: WhatsApp क्लाऊड स्टोरेजमध्ये किती फ्री स्टोरेज मिळणार आहे?

    Ans: रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप यूजर्सना 2GB मोफत क्लाऊड स्टोरेज देणार आहे.

  • Que: WhatsApp Plus सबस्क्रिप्शनमध्ये किती स्टोरेज मिळते?

    Ans: WhatsApp Plus सबस्क्रिप्शनद्वारे यूजर्सना 100GB पर्यंत क्लाऊड स्टोरेज मिळू शकते. भारतात या प्लॅनची किंमत 79 रुपये प्रति महिना आहे.

Web Title: Whatsapp testing its own cloud backup storage with 2gb free space hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय
1

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय

Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
2

Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Apple चाहत्यांनो तयार राहा!  2027 मध्ये येणार iPhone चे 3 नवे मॉडेल्स, डिव्हाईसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स
3

Apple चाहत्यांनो तयार राहा! 2027 मध्ये येणार iPhone चे 3 नवे मॉडेल्स, डिव्हाईसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई
4

स्पॅम कॉल्स आणि मेसेज करणाऱ्यांनो सावधान! TRAI ने उचलले मोठे पाऊल, 1.24 लाख नंबरवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.