Instagram Update: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नवं फीचर तुम्हाला मिळालं का? Map मध्ये दिसणार रिेल्स, स्टोरी आणि पोस्ट्स
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने भारतातील युजर्ससाठी एक नवं मॅप फीचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. हे आतापर्यंतचं सर्वात वेगळ आणि मजेदार फीचर असणार आहे. या फीचरचा वापर करून आता युजर्स त्यांच्या निवडलेल्या मित्र किंवा ग्रुपसोबत लास्ट एक्टिव लोकेशन शेयर करू शकणार आहेत. तसेच तुम्हाला या फीचरमध्ये शेअर करण्यात आलेल्या लोकेशनसंबंधित रील, स्टोरी, नोट्स आणि पोस्ट देखील दिसणार आहेत. म्हणजेच आता तुम्हाला केवळ एका मॅपमध्ये रिल्स, स्टोरी आणि पोस्ट दिसणार आहे.
तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा आणि चॅट विभागात जा. आता तुम्हाला वरील बाजूला मॅप दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला वेगवेगळे लोकेशन म्हणजेच ठिकाण दिसतील. आता तुमच्या स्मार्टफोनचे लोकशन चालू असेल तर तुम्ही तुमचं लोकेशन तुमच्या मित्रांसोबत किंवा एखाद्या ग्रुपसोबत शेअर करू शकता. जर तुम्हाला तुमचं लोकेशन शेअर करायचं नसेल तर तुम्ही येथे तुमच्या मित्रांनी शेअर केलेले लोकेशन आणि त्यांसंबंधित रिल्स पाहू शकता. समजा, मॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला ठाणे दिसत असेल, आता तुमच्या फॉलिंईंग लिस्टमध्ये असलेल्या ज्या युजर्सनी त्यांच्या रील, स्टोरी, नोट्स आणि पोस्टमध्ये ठाण्याचे लोकेशन टॅग केले असेल त्या सर्व रील, स्टोरी, नोट्स आणि पोस्ट तुम्हाला इथे दिसणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
या खास मॅपने युजर्स त्यांच्या लोकेशन शेयरिंग प्रेफरेंसला कस्टमाइज देखील करू शकणार आहेत. म्हणजेच तुम्हाला तुमचं लोकेशन कोणकोणासोबत शेअर करायचं आहे हे देखील तुम्ही ठरवू शकणार आहात. कोणत्या ठिकाणी तुम्हाला लोकशन शेअरिंग चालू ठेवायचे आणि कोणत्या ठिकाणी बंद ठेवायचं हे देखील आता युजर्स ठरवू शकणार आहेत. तसेच टीन यूजर्सच्या सुपरवाइज्ड अकाउंट्सला जेव्हा लोकेशन शेयरिंग ऑन केली जाणार आहे, तेव्हा त्यांच्या पालकांना नोटिफिकेशन पाठवली जाणार आहे. मॅपवर दिसणारा कंटेट 24 तासांसाठी विजिबल रा हणार आहे. तुम्ही DM इनबॉक्स आयकॉनवरून मॅप फीचर एक्सेस करू शकता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने यापूर्वी हे फीचर काही देशांमध्ये लाँच केले होते. आता हे फीचर भारतात लाँच करण्यात आले आहे. भारतातील लाँचसोबत या फीचरमध्ये काही बदल देखील करण्यात आले आहेत. ज्यामुळे युजर्सना लोकेशन शेयरिंग आणि प्राइवेसीबाबत जास्त क्लॅरिटी मिळणार आहे. मॅपच्या वरच्या बाजूला आता एक इंडिकेटर दिसणार आहे, जो सांगेल की लोकेशन शेयरिंग ऑन आहे की ऑफ. Notes ट्रे मध्ये प्रोफाइल फोटोच्या खाली देखील एक संकेत दिला जाणार आहे, जो सांगणार आहे की, यूजर लोकेशन शेअर करत नाही. प्रोफाइल फोटो आता लोकेशन-टॅग केलेल्या कंटेंटच्या वर दिसणार नाही जेणेकरून कोणीही ते लाईव्ह लोकेशन आहे असे समजू नये. याशिवाय एक रिमाइंडर मेसेज देखील दिला जाणार आहे, ज्यामध्ये सांगितलं जाणार आहे की, जर तुम्ही कोणत्याही पोस्ट, रील किंवा स्टोरीमध्ये एखादे स्थान टॅग केले तर ते नकाशावर दिसेल.