IMC 2025: यशोभुमित टेक महाकुंभाचे आयोजन! पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन, 5G-6G सह या संकल्पनांनी वेधलं लक्ष
भारताच्या डिजिटल आणि मोबाइल टेक्नोलॉजीच्या जगातील सर्वात मोठ्या ईव्हेंटचे आज आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजी इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2025 च्या 9 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे. दिल्लीतील यशोभूमीमध्ये इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठीस मोठंमोठ्या दिग्गज्यांनी उपस्थिती लावली आहे. केंद्रीय दळणवळण आणि विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी आणि भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल हे देखील आता कार्यक्रमस्थळी पोहोचले आहे.
Free Fire Max: आत्ताच क्लेम करा गरेनाने जारी केलेले नवीम रिडीम कोड्स, मिळवा खास इन-गेम रिवॉर्ड्स
नवी दिल्लीमध्ये आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, मीडिया आणि टेक्नोलॉजी प्रोग्राम, इंडिया मोबाइल कांग्रेसच्या 9 व्या आवृत्तीची सुरुवात झाली आहे. हा ईव्हेंट 8 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या ईव्हेंटमध्ये टेलीकॉम आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. यावेळी सर्वांचे लक्ष SATCOM म्हणजेच सॅटेलाइट कम्यूनिकेशन कडे लागले आहे. भारत सरकार देखील याविषयी प्रचंड उत्सुक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती देखील दिला आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, बुधवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:45 वाजता, मी यशोभूमी, नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसला उपस्थित राहणार आहे. या बैठकीत “नवोपक्रमातून परिवर्तन” या विषयावर चर्चा होईल. हे व्यासपीठ भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकेल आणि या क्षेत्रातील वाढीला चालना देण्याच्या मार्गांवर देखील चर्चा करेल.
यावर्षी IMC मध्ये भारतातील 6G विजनवर चर्चा केली जाणार आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर वाढावा यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय सॅटेलाइट इंटरनेटवर भारताची काय भुमिका आहे, याबाबत देखील माहिती दिली जाणाक आहे. इंडिया मोबाइल कांग्रेस डिजिटल क्षेत्रात भारताच्या वाढत्या नेतृत्वाचे प्रतीक असलेले हे आशियाई आणि जागतिक तंत्रज्ञान परिषद म्हणून उदयास आले आहे.
IMC ची यावर्षीची थीम इनोवेट टु ट्रांसफॉर्म अशी ठेवण्यात आली आहे. हे इंडियाच्या डिजिटल ट्रांसफॉर्मेंशन देखील दर्शविते. 4 दिवस चालणाऱ्या या ईव्हेंटमध्ये टेक कंपन्या त्यांचे प्रोडक्ट्स, सर्विसेज आणि इनोवेशन्स सादर करणार आहेत. IMC ईव्हेंटमध्ये ऑप्टिकल कम्यूनिकेशन्स, सेमिकंडक्टर्स, क्वॉन्टम कम्यूनिकेशन, 6G आणि फ्रॉड रिस्क इंडिकेटर्सवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यासोबतच यावेळी नेक्स्ट जेनेरेशन कनेक्टिविटीसह साइबर फ्रॉड प्रिवेंशनबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचे काम केले जाणार आहे.
इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC) च्या या ईव्हेंटमध्ये 150 हून अधिक देशांमधून 1.5 लाख अधिक पाहूणे, 7,000 हून अधिक जागतिक प्रतिनिधी आणि 400 हून अधिक कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 5जी-6जी, एआई, स्मार्ट मोबिलिटी, साइबर सुरक्षा, क्वांटम कंप्यूटिंग आणि ग्रीन टेक्नोलॉजी (हरित प्रौद्योगिकी) सारख्या क्षेत्रात 100 हून अधिक सत्रे आणि 800 हून अधिक स्पीकर्सद्वारे 1,600 हून अधिक नवीन वापर-केस प्रदर्शित केले जातील.
IMC चा फुल फॉर्म काय आहे?
इंडिया मोबाइल कांग्रेस
2025 चा IMC ईव्हेंट कुठे आयोजित करण्यात आला आहे?
यशोभुमी, दिल्ली
IMC 2025 ची थीम काय आहे?
इनोवेट टु ट्रांसफॉर्म