Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram वर होणार मोठा बदल! कंपनी हटवणार हे महत्त्वाचं प्रायव्हसी फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Instagram End to End encryption Privacy Feature: फोटो आणि व्हिडीओ शेअरींग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी प्लॅटफॉर्मवरील महत्त्वाचे फीचर हटवण्याची तयारी करत आहे. ज्याचा परिणाम यूजर्सवर होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 14, 2026 | 11:57 AM
Instagram वर होणार मोठा बदल! कंपनी हटवणार हे महत्त्वाचं प्रायव्हसी फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Instagram वर होणार मोठा बदल! कंपनी हटवणार हे महत्त्वाचं प्रायव्हसी फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • व्हिडीओ शेअरींग अ‍ॅपवर आता कोणत्याही चॅट्स प्रायव्हेट राहणार नाही
  • इंस्टाग्राम डिएममधून एंड-टू-एंड एनक्रिप्शन (E2EE) फीचर हटवण्याचा निर्णय
  • महत्त्वाचे फीचर हटवल्याने यूजर्सवर होणार परिणाम
सर्व इंस्टाग्राम यूजर्ससाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या सर्व यूजर्सवर होणार आहे. 8 मे पासून प्लॅटफॉर्मवर एक मोठा बदल होणार आहे. मेटाच्या मालकीच्या या फोटो आणि व्हिडीओ शेअरींग अ‍ॅपवर आता कोणत्याही चॅट्स प्रायव्हेट राहणार नाही. याच कारण म्हणजे कंपनीने आता इंस्टाग्राम डिएममधून एंड-टू-एंड एनक्रिप्शन (E2EE) फीचर हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाने त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती शेअर केली आहे.

देशी कंपनीने सर्वांना केलं चकित… 12,999 रुपयांत लाँच केला दमदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे की, इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजमधून एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर हटवण्यात आले आहे. खरं तर 2023 मध्ये कंपनीने इंस्टाग्राममध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर जोडले होते. मेटाने व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरसाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर आणले होते. मात्र आता कंपनीने हे फीचर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

डायरेक्ट मेसेज नाही राहणा प्रायव्हेट

एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर हटवल्यानंतर आता यूजर्स इंस्टाग्रामवर कोणत्या व्यक्तीसोबत बोलत आहेत, याचा संपूर्ण एक्सेस मेटाकडे असणार आहे. म्हणजेच आता यूजर्सच्या चॅट्सवरील प्रायव्हसी हटवली जाणार आहे. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचरमुळे इंस्टाग्रामवरील मेसेज केवळ सेंडर आणि रिसीवरपर्यंत असतात. हे मेसेज मेटाद्वारे देखील एक्सेस केले जाऊ शकत नव्हते. मात्र आता असं होणार नाही. कारण कंपनी आता महत्त्वाचे फीचर हटवणार आहे.

जुने चॅट्स करू शकता डाऊनलोड

मेटाने त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, इंस्टाग्राममध्ये केल्या जाणाऱ्या या बदलामुळे जर यूजर्सना त्यांच्या जुन्या चॅट्स सुरक्षित आणि प्रायव्हेट ठेवायच्या असतील तर दिलेल्या सूचनांच्या मदतीने तुम्ही तुमचे वैयक्तिक मीडिया आणि चॅट्स डाउनलोड करू शकता. पर्सनल चॅट्स डाऊनलोड करण्यासाठी यूजर्सना त्यांचे इंस्टाग्राम अ‍ॅप लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करावे लागणार आहे. मेटाने घेतलेल्या या निर्णयानंतर आता यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंस्टाग्रामनंतर फेसबुक मेसेंजर देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन काढून टाकेल का? सध्या कंपनीकडून या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Instagram वरील घाणेरड्या Comments मुळे वैतागलात? सुटका करण्यासाठी करावे लागेल हे छोटे काम, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

कंपनीने का घेतला हा निर्णय?

काही दिवसांपूर्वी बाल शोषण प्रकरणी मेटाच्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचरवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अमेरिका आणि यूकेमधील अनेक सरकारी एजेसिंनी बाल शोषणाप्रकरणी व्हायरल झालेला कंटेंट डिटेक्ट करण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन हटवण्याची मागणी केली होती. व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे, इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरमध्ये देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे, त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवरील संभाषणे पूर्णपणे खाजगी राहतात आणि MeMe किंवा इतर कोणत्याही एजन्सीद्वारे ती अ‍ॅक्सेस करता येत नाहीत. मात्र आता इंस्टाग्रामवरील हे फीचर हटवल्यानंतर यूजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होणार, यात काही शंकाच नाही.

Web Title: Instagram will remove end to end encryption privacy feature users chats will no more private tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

Cyber Fraud News: सावधान! सोशल मीडियावरील ‘या’ चुका पडतील महागात, बँक खाते होईल रिकामे; सरकारची मोठी चेतावणी
1

Cyber Fraud News: सावधान! सोशल मीडियावरील ‘या’ चुका पडतील महागात, बँक खाते होईल रिकामे; सरकारची मोठी चेतावणी

Earthquake Alert : भूकंपापूर्वीच मोबाईल करेल सावध! या खास फिचरमुळे काही सेकंद आधी मिळतो अलर्ट
2

Earthquake Alert : भूकंपापूर्वीच मोबाईल करेल सावध! या खास फिचरमुळे काही सेकंद आधी मिळतो अलर्ट

RBI Rules: ऑनलाइन फसवणूक झाल्यास काळजी करू नका; RBIकडून 25 हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाईची तरतूद
3

RBI Rules: ऑनलाइन फसवणूक झाल्यास काळजी करू नका; RBIकडून 25 हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाईची तरतूद

Google Home Speaker: एआयच्या शक्तीवर चालणारा गुगलचा नवा स्मार्ट स्पीकर, जाणून घ्या वैशिष्ट्ये
4

Google Home Speaker: एआयच्या शक्तीवर चालणारा गुगलचा नवा स्मार्ट स्पीकर, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.