Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात इंटरनेटची वाढती क्रेझ; वर्षभरात जोडले कोट्यावधी नवीन युजर्स, Jio आणि Airtel आघाडीवर

गेल्या एका वर्षात देशात ७.३ कोटी नवीन इंटरनेट ग्राहक आणि ७.७ कोटी नवीन ब्रॉडबँड ग्राहक जोडले गेले आहेत. ही वाढ देशाच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दूरसंचार क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या चालू असलेल्या वचनबद्धतेमुळे आगामी वर्षांत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 21, 2024 | 03:39 PM
देशात इंटरनेटची वाढती क्रेझ; वर्षभरात जोडले कोट्यावधी नवीन युजर्स, Jio आणि Airtel आघाडीवर (फोटो सौजन्य- pinterest)

देशात इंटरनेटची वाढती क्रेझ; वर्षभरात जोडले कोट्यावधी नवीन युजर्स, Jio आणि Airtel आघाडीवर (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने इंटरनेट युजर्सची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार देशभरात इंटरनेटचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. या अहवालानुसार इंटरनेट युजर्सची संख्या 120.5 कोटी पार झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रायच्या अहवालानुसार, Reliance Jio आणि Bharti Airtel ने नवीन ग्राहक जोडल्यामुळे भारतीय दूरसंचार ग्राहकांची संख्या जूनमध्ये 120.5 कोटी पार झाली आहे.

हेदेखील वाचा- Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली! BSNL-TATA च्या करारानंतर आता इंटरनेटची चाचणी सुरू

भारताच्या दूरसंचार क्षेत्रात गेल्या एका वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. या काळात भारतीय टेलिकॉमने काही आश्चर्यकारक रेकॉर्ड केले आहेत. गेल्या एका वर्षात कोट्यवधी नवीन ग्राहक भारतीय दूरसंचार विभागाशी जोडले गेले आहेत. गेल्या एका वर्षात देशात 7.3 कोटी नवीन इंटरनेट ग्राहक आणि 7.7 कोटी नवीन ब्रॉडबँड ग्राहक जोडले गेले आहेत. परवडणाऱ्या दरात डेटाची उपलब्धता, चांगले नेटवर्क कव्हरेज आणि डिजिटल सेवांची वाढती मागणी या कारणांमुळे ग्राहकांची संख्या वाढत आहे. ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे देशातील हायस्पीड इंटरनेटची पोहोच वाढत आहे, ज्यामुळे ई-कॉमर्स, ऑनलाइन शिक्षण, दूरसंचार आणि इतर डिजिटल सेवांच्या वाढीला चालना मिळत आहे.

इंटरनेट ग्राहकांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे भारत जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट बाजारपेठांपैकी एक बनला आहे. दूरसंचार क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने अनेक धोरणात्मक पाऊले उचलली आहेत. TRAI च्या जूनमधील सबस्क्राइबर रिपोर्टमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, वायरलेस ग्राहकांची संख्या वाढून 117 कोटींहून अधिक झाली आहे. मे महिन्यात ही संख्या 3.47 वाढून 116.89 कोटी झाली होती. त्यानंतर जूनमध्ये ही संख्या 3.51 कोटींनी वाढून 117 कोटींहून अधिक झाली आहे. Reliance Jio आणि Bharti Airtel ने दोन्ही क्षेत्रातील वाढीचे नेतृत्व केले.

हेदेखील वाचा- हरवलेली वस्तू शोधण्यासाठी वापरा JioTag Air! काय आहे किंमत जाणून घ्या

भारतातील टेलिफोन ग्राहकांची एकूण संख्या मे 2024 अखेरमध्ये 1,203.69 मिलियन होती. तर ही संख्या जून 2024 अखेरपर्यंत 1,205.64 मिलियन इतकी वाढली आहे. Reliance Jio ने महिनाभरात 19.11 लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडले, तर Bharti Airtel ने या महिन्यात 12.52 लाख नवीन ग्राहक जोडले. Vodafone Idea (VIL), BSNL, MTNL आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहकांच्या तोट्यामुळे एकूण वायरलेस सेगमेंटमध्ये निव्वळ वाढ 15.73 लाखांवर घसरली.

VI ने या महिन्यात 8.6 लाख ग्राहक गमावले, BSNL ने 7.25 लाख गमावले, MTNL ने 3,927 गमावले, तर RCom ने 2 वायरलेस सदस्य गमावले. वायरलाइन सेगमेंटमध्ये, Reliance Jio ने 4.34 लाख नवीन ग्राहक जोडून या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. यानंतर एअरटेलने 44,611 नवीन ग्राहक जोडले, VI ने 21,042 आणि VMIPL ने 13,996 नवीन ग्राहक जोडले. BSNL ने जूनमध्ये सर्वाधिक वायरलेस ग्राहक गमावले. कंपनीने 60,644 ग्राहक गमावले. क्वाड्रंटने 37,159 ग्राहक गमावले, तर Tata Teleservices ने 32,315, MTNL ने 6,218 आणि APSFL ने 829 ग्राहक गमावले.

Web Title: Internet craze is growing in the country jio added 19 11 lakh users as airtel added 12 52lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 03:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.