फोटो सौजन्य -Jio
आपली एखादी वस्तू हरवली, की ती वस्तू शोधण्यासाठी आपण संपूर्ण घर डोक्यावर घेतो. एक वस्तू शोधण्यासाठी घरात इतर वस्तूंचा पसारा काढला जातो. पण आता तुम्हाला कोणत्याही हरवलेल्या वस्तूसाठी घर डोक्यावर घेण्याची गरज नाही. हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी Jio ने लेटेस्ट असेट ट्रॅकर लाँच केला आहे. JioTag Air च्या मदतीने तुम्ही तुमची हरवलेली वस्तू अगदी सहज शोधू शकता. Reliance Jio त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन प्रोडक्ट लाँच करत असते. पण JioTag Air ची थेट स्पर्धा Apple च्या एअरटॅगशी आहे. त्यामुळे ग्राहक कोणत्या कंपनीच्या प्रोडक्टला सर्वाधिक पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेदेखील वाचा- नायजेरियाने Meta ला ठोठावला 22 कोटी रुपयांचा दंड; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
Reliance Jio ने दावा केला आहे की या गॅझेटच्या मदतीने युजर्स त्यांच्या मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवण्यास सक्षम असतील. यासोबतच एका खास ऑफरमध्ये तुम्ही Amazon वरून JioTag Air केवळ 1,499 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. जर तुमची कोणतीही वस्तू हरवली तर तुम्ही या कॉम्पॅक्ट डिव्हाइसद्वारे ती वस्तू ट्रॅक करू शकता आणि शोधू शकता. जिओटॅगची खास गोष्ट म्हणजे हा ॲपलच्या एअरटॅगपेक्षा स्वस्त आहे. JioTag Air हे Apple Find My Network आणि JioThings ॲप दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करू शकते. ज्यामुळे युजर्स JioTag Air अधिक सहजपणे वापरण्यास सक्षम असतील. परंतु लक्षात ठेवा की ते एका वेळी एकाच प्लॅटफॉर्मवर काम करण्यास सक्षम असेल.
हेदेखील वाचा- India Post मधून तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी मॅसेज आला आहे का? आताच सावध व्हा
आयफोन युजर्स, आयपॅड आणि मॅकवर ॲपल फाइंड माय ॲपद्वारे जिओटॅग एअर वापरू शकतात. ज्या Apple युजर्सना Apple AirTag व्यतिरिक्त इतर कोणताही ब्रँड वापरायचा आहे, त्यांच्यासाठी JioTag Air उत्तम पर्याय आहे. युजर्स Google Play Store आणि Apple App Store वरून JioThings ॲप इन्स्टॉल करू शकतात. जिओटॅग एअर 90-120db पर्यंत आवाज प्रदान करते, ज्यामुळे युजर्स हरवलेली वस्तू त्वरीत शोधू शकतात. याशिवाय, जिओटॅग एअर हे देखील काळजी घेते की तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू मागे राहणार नाही. यासाठी, जेव्हा तुम्ही वस्तूच्या रेंजच्या बाहेर असता, तेव्हा डिव्हाइस तुम्हाला डिस्कनेक्शन अलर्ट देते. ज्यामुळे युजर्सना त्या वस्तूची आठवण होते.
जर युजर्सनी ॲपल फाइंड माय ॲपद्वारे जिओटॅग एअरचा वापर केला तर त्याला त्याचा भरपूर फायदा होईल. कोणतीही वस्तू हरवल्यास युजर्स लॉस्ट मोड देखील वापरू शकतात. जिओटॅग एअर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 1,499 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. तर Apple चा AirTag 2,889 रुपयांना उपलब्ध आहे. जिओटॅग एअरसोबत अतिरिक्त बॅटरी आणि एक केबल उपलब्ध आहे. JioTag Air ग्रे, ब्लू आणि रेड अशा 3 रंगात उपलब्ध आहे.