iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?
iOS 26 Public Beta: सध्या सर्वत्र केवळ Apple च्या आगामी स्मार्टफोनचीच चर्चा सुरु झाली आहे. या आयफोन सिरीजच्या लाँचिंगसाठी युजर्स प्रचंड उत्साही आहेत. हि सिरीज लाँच होण्यापूर्वीच त्याबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. ही सिरीज लाँच होण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र आगामी सिरीजच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने iOS 26 पब्लिक बीटा अपडेट रिलीज केले आहेत.
आगामी आयफोन 17 सिरीज लाँच होण्यापूर्वीच कंपनीने iOS 26 चे फाइनल पब्लिक बीटा जारी केले आहे. हे बीटा वर्जन 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटपू्र्वीच रिलीज करण्यात आले आहे. आता भारतासह जभरातील युजर्ससाठी ज्यांनी बीटा प्रोग्रामसाठी रजिस्टर केले आहे, त्यांच्यासाठी हे अपडेट आता उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple ने यावेळी iOS 19 ते iOS 25 पर्यंत सर्व वर्जन स्किप केले आहेत. यावेळी कंपनीने सरळ iOS 26 लाँच केले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, इतके iOS अपडेट स्किप करण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे यामुळे युजर्सना कोणते iOS नवीनतम आहे हे समजणे सोपे होईल. या हालचालीमुळे अॅपलची रणनीती आणखी सरळ आणि पारदर्शक बनते.
जर तुम्ही Apple Beta Program मध्ये साइन अप केले असेल तर अशा युजर्ससाठी iOS 26 पब्लिक बीटा डाऊनलोड करणं अत्यंत सोपं झालं आहे. यासाठी, तुम्हाला तुमच्या आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत:
बीटा आवृत्तीमध्ये कधीकधी बग असू शकतात किंवा डेटा गमावला जाऊ शकतो, त्यामुळे बीटा इंस्टॉल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आयफोनच्या डेटाचा बॅकअप घ्यावा असा सल्ला कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना दिला आहे.
आता रिलीज करण्यात आलेले अपडेट गेल्या काही वर्षांमध्ये iOS मध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बदलांपैकी एक आहे. या नवीन अपडेटचे फीचर्स जाणून घेऊया.
Liquid ग्लास डिझाईन – ट्रान्सलुसंट इफेक्ट आता अॅप्समध्ये उपलब्ध असेल ज्यामुळे इंटरफेस आणखी भविष्यवादी दिसेल.
नवीन फोन अॅप – आता कॉल्स, फेस टाईम आणि मेसेजेसना रियल-टाइममध्ये ट्रांसलेट केले जाऊ शकते.
iMessage मध्ये पोल्स – व्हॉट्सअॅपप्रमाणे, आता थेट iMessage वर देखील पोल तयार करता येतील.
स्पॅम कॉल फिल्टर – बनावट आणि स्पॅम कॉल्स आपोआप फिल्टर केले जाणार आहेत
फोटो अॅप अपग्रेड – नवीन लायब्ररी आणि कलेक्शन टॅबसह फोटो मॅनेज करणे सोपे होईल.
व्हिज्युअल इंटेलिजन्स (AI फीचर) – स्मार्ट रिकग्निशन आणि सूचना वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी मदत करणार आहेत.