iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच समोर आल्या आगामी आयफोनच्या किंमती, सिरीजमध्ये काय असणार खास? जाणून घ्या
9 सप्टेंबर रोजी आगामी आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. आगामी आयफोनच्या लाँचिंगसाठी कंपनीने एका खास ईव्हेंटचे देखील आयोजन केले आहे. यावेळी कंपनी त्यांची नवीन आयफोन सिरीज अनेक अपडेट आणि अपग्रेडसह लाँच करणार आहे. आगामी आयफोन सिरीजमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. अवघ्या काही तासांत ही सिरीज लाँच केली जाणार आहे. सिरीज लाँच होण्यापूर्वीच अनेक अपडेट्स समोर येत आहेत.
iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड
असं सांगितलं जात आहे की, कंपनी यावेळी त्यांच्या सिरीजमध्ये एक रेग्युलर आणि दोन प्रो मॉडेल लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कंपनी त्यांच्या सिरीजमधून प्लस मॉडेल काढून टाकणार आहे. या मॉडेलऐवजी कंपनी iPhone 17 Air हे नवीन मॉडेल लाँच करणार आहे. या आयफोन मॉडेलची थिकनेस केवळ 5.5mm असणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी यावेळी नवीन डिझाईनसह त्यांची आगामी आयफोन सिरीज लाँच करणार आहे. iPhone 17 Pro आणि Pro Max च्या लीकमध्ये एक मोठा रेक्टेंगुलर कॅमेरा आयलँड पाहायाला मिळत आहे. iPhone 17 आणि Pro मध्ये 6.3 इंच XDR OLED स्क्रीन आणि Pro Max मध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे बेस iPhone 17 मध्ये देखील ProMotion डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे.
iPhone 17 मध्ये नवीन A19 चिपसेट दिला जाणार आहे, तर Pro आणि Pro Max मध्ये A19 Pro चिप दिली जाणार आहे. यामुळे परफॉर्मेंस आणि बॅटरी अधिक चांगली होणार आहे. बॅटरीचा आकार पूर्वीपेक्षा मोठा असणार आहे. iPhone 17 Pro Max मध्ये 5000 mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. चार्जिंग स्पीड सुमारे 25W असू शकते परंतु प्रो मॉडेल्समध्ये रिव्हर्स वायर्ड चार्जिंग दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही प्रवासात एअरपॉड्ससारखे गॅझेट चार्ज करू शकता.
वॅनिला iPhone 17 मध्ये कॅमेरा सेटअप जळपास तसाच असणार आहे, म्हणजेच 48MP प्राइमरी आणि12MP अल्ट्रा-वाइड. मात्र Pro आणि Pro Max मध्ये यावेळी ट्रिपल 48MP कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 12MP हून अपग्रेड करून 24MP केला जाऊ शकतो.