Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo Find X10 चा प्रीमियम लूक होणार आणखी खास! चीनमध्ये नवे Forest Green व्हेरिअंट लाँच, ‘या’ दिवशी सुरु होणार विक्री

Oppo Find X10 New Variant: चीनमध्ये ओप्पो फाईंड एक्स10 चे एक नवीन कलर व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना हा प्रिमियम स्मार्टफोन एका नवीन रंगात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2026 | 11:55 AM
Oppo Find X10 चा प्रीमियम लूक होणार आणखी खास! चीनमध्ये नवे Forest Green व्हेरिअंट लाँच, 'या' दिवशी सुरु होणार विक्री

Oppo Find X10 चा प्रीमियम लूक होणार आणखी खास! चीनमध्ये नवे Forest Green व्हेरिअंट लाँच, 'या' दिवशी सुरु होणार विक्री

Follow Us
Follow Us:
  • फाईंड एक्स 10 मॉडेल एका नवीन रंगात सादर
  • नवीन कलर व्हेरिअंटची विक्री चीनमध्ये 30 ऑक्टोबरपासून सुरु होणार
  • डिव्हाईसमध्ये 6.59 इंच एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले
Oppo Smartphone Launched: अलीकडेच टेक कंपनी ओप्पोने त्यांची फ्लॅगशिप स्मार्टफोन Find X10 सीरीज लाँच केली होती. या सिरीजअंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन्स लाँच केले होते. ज्यामध्ये ओप्पो फाईंड एक्स10 आणि ओप्पो फाईंड एक्स 10 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. आता कंपनीने या सिरीजमधील फाईंड एक्स 10 मॉडेल एका नवीन रंगात सादर केले आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे फॉरेस्ट ग्रीन कलर व्हेरिअंट लाँच केले आहे. हे नवीन कलर व्हेरिअंट कंपनीने आर्टिस्ट Karlotta Freier च्या सहकार्याने तयार केले आहे.

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा

कंपनीने लाँच केलेल्या डिव्हाईसच्या नवीन कलर व्हेरिअंटची विक्री चीनमध्ये 30 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अद्याप या नवीन व्हेरिअंटची किंमत जाहीर करण्यात आली नाही. तसेच हे नवीन कलर व्हेरिअंट भारत किंवा इतर देशांमध्ये लाँच केले जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य: X) 

स्मार्टफोनची किंमत

कंपनीने अद्याप ओप्पो फाईंड एक्स 10 फॉरेस्ट ग्रीन व्हेरिअंटची किंमत जाहिर केली नाही. मात्र या स्मार्टफोनच्या आधीपासूनच उपलब्ध असलेल्या व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत चीनमध्ये 5,499 युआन म्हणजेच सुमारे 78 हजार रुपये आहे. तर डिव्हाईसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,39,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्लेशियर ब्लू, मिस्ट टायटॅनियम आणि कोरल रंगात लाँच करण्यात आला आहे. आता यामध्ये एक नवीन फॉरेस्ट ग्रीन व्हेरिअंट देखील जोडले आहे.

ओप्पो फाईंड एक्स 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.59 इंच एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिव्हाईसच्या चारही बाजूला 0.99mm चे सिमेट्रिकल बेजल्स मिळणार आहे, जे अतिशय प्रिमियम अनुभव ऑफर करतात. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9600M प्रोसेसर देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय मिळणार आहे.

बॅटरी

सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर नवीन ओप्पो डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 17 वर आधारित कलरओएस 17 मिळणार आहे. या फोनमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये माइक्रो-टेक्सचर्ड मेटल फ्रेम आणि वेलवेट फिनिशवाले ग्लास बॅक देखील मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळणार आहे.

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यासोबतच या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन म्हणजेच ओआयएससह 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. या फोनमध्ये 200MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओप्पो फाईंड एक्स10 चे नवीन फॉरेस्ट ग्रीन व्हेरिएंट कधी लॉन्च झाले?

    Ans: ओप्पोने फाईंड एक्स10 स्मार्टफोनचे नवीन फॉरेस्ट ग्रीन कलर व्हेरिएंट सादर केले आहे. या व्हेरिएंटची चीनमध्ये विक्री ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

  • Que: ओप्पो फाईंड एक्स10 फॉरेस्ट ग्रीन व्हेरिएंटची किंमत किती आहे?

    Ans: कंपनीने नवीन फॉरेस्ट ग्रीन व्हेरिएंटची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, चीनमध्ये आधीच्या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ५,४९९ युआन म्हणजेच अंदाजे ७८ हजार रुपये आहे.

  • Que: ओप्पो फाईंड एक्स10 फॉरेस्ट ग्रीन भारतात लॉन्च होणार का?

    Ans: नवीन फॉरेस्ट ग्रीन व्हेरिएंट भारतात लॉन्च होणार की नाही, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

Web Title: Oppo find x10 launched in new forest green color variant sell will starts from this day hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स
1

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स

Oppo Enco X4 :  ओप्पोचे प्रीमियम इअरबड्स भारतात दाखल, 53 तासांचा बॅटरी बॅकअप, किंमत काय
2

Oppo Enco X4 : ओप्पोचे प्रीमियम इअरबड्स भारतात दाखल, 53 तासांचा बॅटरी बॅकअप, किंमत काय

12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष… जाणून घ्या डिटेल्स
3

12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष… जाणून घ्या डिटेल्स

पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी
4

पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.