Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple युजर्सची मजाच मजा! जुन्या मॉडेल्समध्ये मिळणार iPhone 16 सीरीजचं ‘हे’ कमाल फीचर, जाणून घ्या सविस्तर

आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स सारख्या जुन्या मॉडेल्समध्ये आता आयफोन 16 सिरीजचं एक फीचर उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हे फीचर आयफोन 16 सिरीज युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 22, 2025 | 11:12 AM
Apple युजर्सची मजाच मजा! जुन्या मॉडेल्समध्ये मिळणार iPhone 16 सीरीजचं 'हे' कमाल फीचर, जाणून घ्या सविस्तर

Apple युजर्सची मजाच मजा! जुन्या मॉडेल्समध्ये मिळणार iPhone 16 सीरीजचं 'हे' कमाल फीचर, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी अ‍ॅपल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने गेल्या वर्षी 2024 मध्ये iPhone 16 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने अनेक नवीन आणि अपग्रेड फीचर्स दिले, ज्यामुळे युजर्सचा अनुभव आणखी चांगला बनला. आयफोन 16 सिरीजचे सर्वच फीचर्स लोकप्रिय आहेत. यापैकीच एक फीचर म्हणजे अ‍ॅपलचे व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर. व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचरला युजर्सनी प्रचंड लोकप्रियता दर्शवली होती. व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचरची वाढती लोकप्रियता पाहून आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Apple iPhone: नवीन iPhone लाँच होताच Apple ने बंद केले ‘हे’ तीन मॉडेल्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर

कंपनीने आयफोन 16 सिरीजचे व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर आता जुन्या मॉडेल्ससाठी देखील रोल आऊट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अ‍ॅपलने आयफोन युजर्सना आनंदित केले आहे. कंपनीने जाहीर केले आहे की आता आयफोन 16 सिरीजमधील व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स सारख्या जुन्या मॉडेल्समध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता ज्या युजर्सकडे आयफोनचं जुनं मॉडेल आहे ते देखील या व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचरचा आनंद घेऊ शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी सॉफ्टवेअर अपडेटमध्ये हे फीचर रोल आऊट केलं जाऊ शकतं. त्यामुळे येणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेटनंतर युजर्स याचा आनंद घेऊ शकतील. आतापर्यंत हे फीचर फक्त आयफोन 16 सिरीजमधील डिव्हाईसमध्ये उपलब्ध आहे. आता त्याची व्याप्ती वाढवली जात आहे. त्यामुळे आता हे फीचर जुन्या मॉडेल्ससाठी देखील रोल आऊट केलं जाणार आहे.

अ‍ॅपलचे व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर

या फीचरच्या मदतीने, युजर्स कॅमेरा फोकस करून कोणत्याही वस्तू किंवा मजकुराची माहिती मिळवू शकतात. ते ऑब्जेक्टबद्दलची सर्व माहिती दाखवू शकते आणि युजर्स मजकूराचे भाषांतर देखील करू शकतात. याशिवाय, ते पुस्तकांचे सारांश सादर करणे, कुत्र्यांच्या जाती ओळखणे इत्यादी कामे देखील करू शकते. हे कोणत्याही परदेशी भाषेचे भाषांतर करू शकते आणि यासाठी युजर्सना इतर कोणत्याही अ‍ॅपवर जाण्याची आवश्यकता नाही. त्याची सर्च कॅपिसिटी वाढवण्यासाठी, त्यात गुगल आणि चॅटजीपीटी एकत्रित करण्यात आले आहेत.

अशा प्रकारे अ‍ॅक्सेस करा अ‍ॅपलचे व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर

आयफोन 15 प्रो युजर्स अ‍ॅक्शन बटण किंवा कंट्रोल सेंटरमधून हे वैशिष्ट्य अ‍ॅक्सेस करू शकतील. कंपनीने आयफोन 16 मध्येही हे फीचर दिले आहे आणि यामध्येही युजर्स कॅमेरा बटणाशिवाय त्याचा फायदा घेऊ शकतील. आयफोन 16 सिरीजमध्ये कॅमेरा वापरण्यासाठी एक डेडिकेटेड बटण आहे. आयफोन 15 प्रो वापरकर्त्यांनाही हे वैशिष्ट्य रोल आऊट केल्याने हे दिसून येते की व्हिज्युअल इंटेलिजेंसमध्ये प्रवेश करण्यासाठी डेडिकेटेड कॅमेरा बटणाची आवश्यकता नाही.

iPhone 16e: ग्राहकांनो पैसे तयार ठेवा, Apple च्या स्वस्त iPhone ची झाली एंट्री! किंमत वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

नवीन फीचर कधी रोलआऊट होणार?

अ‍ॅपलने अद्याप जुन्या युजर्ससाठी हे फीचर कधी आणले जाईल याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु असे मानले जाते की ते iOS 18.4 अपडेटसह आणले जाऊ शकते. हे अपडेट एप्रिलमध्ये येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आयफोन 15 प्रो युजर्सना या फीचरसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Iphone 16 series visual intelligence feature will also roll out for old models like iphone 15 pro tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • iphone

संबंधित बातम्या

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं
1

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
2

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

धोक्यात आहे तुमचा iPhone! Apple ने 1.8 अब्ज युजर्सना केले अलर्ट, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा
3

धोक्यात आहे तुमचा iPhone! Apple ने 1.8 अब्ज युजर्सना केले अलर्ट, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स
4

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.