iPhone 16e: ग्राहकांनो पैसे तयार ठेवा, Apple च्या स्वस्त iPhone ची झाली एंट्री! किंमत वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
Apple च्या नव्या एंट्री-लेव्हल आयफोन मॉडेलने अखेर बाजारात एंट्री केली आहे. पण हा आयफोन लाँच होताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की कंपनी iPhone SE4 लाँच करणार आहे. आणि iPhone SE4 चं कंपनीचा स्वस्त आयफोन म्हणून एंट्री करणार आहे. मात्र कंपनीने iPhone SE4 नाही तर iPhone 16e लाँच करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Facebook Update: फेसबुकच्या नियमांत मोठा बदल, इतक्या दिवसांनी डिलीट होणार युजर्सचे लाईव्ह व्हिडिओ
सप्टेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या 16 सिरीजमधील आणखी नवीन मॉडेल iPhone 16e आता लाँच करण्यात आलं आहे. कंपनीने iPhone 16e लाँच करत 16 लाइनअपचा विस्तार केला आहे. खरं तर सर्वजण iPhone SE4 ची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. त्याबाबत अनेक अपडेट देखील समोर येत होते. त्यामुळे कंपनी iPhone SE4 च लाँच करणार अशी सर्वांना खात्री होती, मात्र आता कंपनीने 16 सिरीजमधील एंट्री-लेव्हल आयफोन iPhone 16e लाँच केला आहे. हा कंपनीचा स्वस्त आयफोन व्हेरिअंट म्हणून लाँच करण्यात आला आहे. चला तर मग कंपनीच्या या स्वस्त आयफोनचे फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – apple)
59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत iPhone 16e लाँच करण्यात आला आहे. Apple ने आयफोन 16 सिरीजमधील सर्वात परवडणारा iPhone 16e मॉडेल तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये आहे. 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये आहे. याशिवाय, त्याच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 69900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 89900 रुपये आहे. यासाठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू होतील. परवडणाऱ्या आयफोनची विक्री 28 फेब्रुवारीपासून सुरू होईल. iPhone 16e काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे, तर आयफोन 16 सिरीज अनेक फॅन्सी रंगांमध्ये उपलब्ध आहे.
एंट्री-लेव्हल मॉडेल असूनही, iPhone 16e मध्ये अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा नॉच iPhone 14 सारखा आहे. iPhone 16e मध्ये अॅपलचा A18 चिपसेट आहे, जो iPhone 16 सिरीजमध्ये आढळतो. हा डिस्प्ले 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन मजबूत करण्यासाठी अॅपल सिरेमिक शील्डचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 3nm A18 चिप प्रोसेसर आहे जो पहिल्यांदा आयफोन 16 मध्ये वापरला गेला होता.
फोटोग्राफीच्या बाबतीत बोलायचे झाले तर, iPhone 16e मध्ये सिंगल 48MP रियर कॅमेरा आहे. त्यात अॅपलचा इन-हाऊस C1 मॉडेम आहे. A18 चिप, C1 मॉडेम आणि iOS 18 च्या कॉम्बिनेशनमुळे बॅटरीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारली आहे, असा दावा अॅपलने केला आहे. यात USB-C पोर्ट आहे. iPhone 16e मध्ये कस्टमायझ करण्यायोग्य अॅक्शन बटण देखील आहे. अॅपल इंटेलिजेंस फीचर्सना सपोर्ट करणारा हा सर्वात परवडणारा आयफोन आहे.
अॅपलने ‘एसई’ ब्रँडिंग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, जो पूर्वी बजेट-फ्रेंडली आयफोनसाठी वापरला जात होता.