Apple iPhone: नवीन iPhone लाँच होताच Apple ने बंद केले 'हे' तीन मॉडेल्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर
टेकजायंट कंपनी Apple ने नुकताच त्यांचा नवीन आणि स्वस्त आयफोन लाँच केला आहे. हा स्वस्त आयफोन iPhone 16e या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने 19 फेब्रुवारी रोजी बुधवारी हा नवीन आणि स्वस्त आयफोन लाँच केला आहे. पण नवीन आणि स्वस्त आयफोन लाँच होताच कंपनीने तीन जुन्या मॉडेल्सचं प्रोडक्शन बंद केलं आहे. यामध्ये iPhone SE 3, iPhone 14 आणि iPhone 14 Plus यांचा समाावेश आहे.
कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे आणि सांगितलं आहे की कंपनी iPhone SE 3, iPhone 14 आणि iPhone 14 Plus आता अधिकृतपणे बंद करणार आहे. याआधी iPhone SE 3 हा कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन होता, तर iPhone 14 हा प्रीमियम आणि आधुनिक वैशिष्ट्यांच्या शोधात असलेल्यांसाठी मूल्यवान डिव्हाइस मानला जात होता. मात्र आता कंपनीने अधिकृतपणे अशी घोषणा केली आहे की, ते त्यांचे तीन जुने मॉडेल्स बंद करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple has officially discontinued the iPhone SE 3, iPhone 14 and iPhone 14 Plus pic.twitter.com/pJLJu0QPPF
— Apple Hub (@theapplehub) February 19, 2025
Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून iPhone SE (तिसरी पिढी), iPhone 14 आणि iPhone 14 Plus काढून टाकण्यात आली आहे. तर यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीने iPhone 15 Pro देखील बंद केला होता. याचा अर्थ असा की आता तुम्ही फक्त iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max, iPhone 16e (28 फेब्रुवारी नंतर), iPhone 15 आणि iPhone 15 Plus हे आयफोन मॉडेल्स Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.
iPhone SE 3, iPhone 14 आणि iPhone 14 Plus पूर्णपणे बंद झालेले नाहीत. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून या आयफोन मॉडेल्सची विक्री बंद केली असली तरी देखील हे आयफोन मॉडेल्स अजूनही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध असतील. परंतु ते आता अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येणार नाहीत.
‘iPhone 16e’ खरंच बजेट फ्रेंडली आहे? सोशल मिडियावर युजर्सनी घातला धुमाकूळ; ‘हे’ मीम्स तुफान व्हायरल
जरी Apple ने iPhone 16 सिरीज लाँच करताना स्पष्ट केले की ते iPhone 14 आणि iPhone 14 Plus बंद करतील. अशा परिस्थितीत, iPhone SE 3 आणि iPhone 14 बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण ते बाजारात लाइटनिंग पोर्ट असलेले एकमेव आयफोन होते आणि ईयूने आता सर्व उपकरणांमध्ये यूएसबी टाइप-सी अनिवार्य केले आहे. त्यामुळे कंपनीने हे मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅपलचा सर्वात परवडणारा आयफोन बाजारात लाँच झाला आहे. या डिव्हाइसमध्ये Apple चे स्वतःचे 5G सेल्युलर मॉडेम आहे, ज्याला C1 म्हणतात. याशिवाय, डिव्हाइसमध्ये A18 चिप, 48-मेगापिक्सेल कॅमेरा, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नाईट मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये मॅगसेफ चार्जिंगची सुविधा नाही. भारतात iPhone 16e ची किंमत 59,900 रुपयांपासून सुरू होते.