iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला टेक जायंट कंपनी Apple ने त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने चार मॉडेल लाँच केले होते. या सिरीजमधील बेस मॉडेल 82,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा बेस मॉडेल अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर क्रोमाची ही ऑफर तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
iPhone 17 लाँच होऊन एक महिना देखील पूर्ण झाला नाही आणि त्याआधीच या स्मार्टफोनवर आता मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. अनेक ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरु आहेत. तुम्ही या सेलमधून आयफोन 16 किंवा आयफोन 15 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण आता आयफोन 17 वर उपलब्ध असलेल्या अशा एका डिलबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे आयफोन 16 किंवा आयफोन 15 खरेदी करण्याचा विचार देखील तुम्ही करणार नाही. डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसनंतर 9 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 17 या बेस मॉडेलवर तब्बल 21 हजार रुपयांचे डिस्काऊंट दिलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
क्रोमा तुम्हाला जबरदस्त डिल आणि ढासू डिस्काऊंटसह लेटेस्ट लाँच आयफोन 17 चे बेस मॉडेल खरेदी करण्याची संधी देत आहे. खरं तर कंपनीने हा बेस मॉडेल आयोजित ईव्हेंटमध्ये 82,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या आयफोनवर 6,000 रुपयांचे इंस्टंट बँक डिस्काउंट दिले जात आहे. ज्यामुळे या लेटेस्ट आयफोन 17 ची किंमत 76,900 रुपये होते. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला आणखी 15 हजार रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. ज्यामुळे आयफोन 17 ची किंमत तब्बल 21 हजार रुपयांनी कमी होते. सर्व डिस्काऊंट आणि ऑफर्सनंतर या स्मार्टफोनची किंमत 61,900 रुपये होते. जर तुम्ही हा फोन थेट Apple वरून खरेदी केला तर कंपनी संपूर्ण iPhone 17 मालिकेवर सवलतीसह नो-कॉस्ट EMI सुविधा देखील देत आहे.
iPhone 17 चे बेस मॉडेल 6.3 इंचाच्या ऑलवेज-ऑन डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये ProMotion टेक्नोलॉजी सपोर्ट देखील आहे. ProMotion पॅनलमुळे iPhone 17 मध्ये देखील प्रो मॉडलप्रमाणेच 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. स्क्रीनवर प्ले होणाऱ्या कंटेंटनुसार ते रिफ्रेश रेट 1 हर्ट्झ ते 120 हर्ट्झ पर्यंत आपोआप समायोजित करते. एल्युमिनियम आणि ग्लास फिनिशिंग वाला हा मॉडेल 7.3mm जाड आहे. हे कंपनीच्या नवीनतम A19 चिपद्वारे समर्थित आहे, 8GB रॅमसह जोडलेले आहे. यात 48MP+12MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. आयफोन 17 चा फ्रंट कॅमेरा केंद्रस्थानी आहे.