Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone युजर्स लक्ष द्या! 30 सप्टेंबरनंतर नाही होणार कॉल रिकॉर्डिंग, Truecaller ने केली घोषणा; काय आहे निर्णयाचं कारण?

iPhone Tips: तुम्ही देखील वारंवार कॉल रेकॉर्डींग फीचरचा वापर करता का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाती बातमी आहे. लवकरच iPhone यूजर्ससाठी उपलब्ध असलेलं Truecaller Call Recording Feature बंद होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2025 | 01:16 PM
iPhone युजर्स लक्ष द्या! 30 सप्टेंबरनंतर नाही होणार कॉल रिकॉर्डिंग, Truecaller ने केली घोषणा; काय आहे निर्णयाचं कारण?

iPhone युजर्स लक्ष द्या! 30 सप्टेंबरनंतर नाही होणार कॉल रिकॉर्डिंग, Truecaller ने केली घोषणा; काय आहे निर्णयाचं कारण?

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone यूजर्ससाठी बंद होणार कॉल रिकॉर्डिंग फीचर
  • ट्रूकॉलरचे ios प्रमुख नकुल काबरा यांनी दिली माहिती
  • ट्रूकॉलर यूजर्सना शेअर केली नोटिफिकेशन
आयफोन युजर्ससाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. आयफोन युजर्स आता कॉल रेकॉर्डिंग करू शकणार नाहीत. कारण Truecaller ने घोषणा केली आहे की, कंपनी आता लवकरच iPhone यूजर्ससाठी सुरु करण्यात आलेलं कॉल रिकॉर्डिंग फीचर बंद करणार आहे. 30 सप्टेंबर 2025 नंतर युजर्स या फीचरचा वापर करू शकणार नाहीत. ट्रूकॉलरचे ios प्रमुख नकुल काबरा यांनी देखील या घोषणेची पुष्टी केली आहे. त्यामुळे जे युजर्स कॉल रिकॉर्डिंग फीचरचा वापर करत होते, त्यांच्यासाठी हे अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?

नकुल काबरा यांनी काय सांगितलं?

ट्रूकॉलरचे ios प्रमुख नकुल काबरा यांनी माहिती दिली आहे की, कंपनीने iOS वरून कॉल रेकॉर्डिंग फीचर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लाईव्ह कॉलर आयडी आणि ऑटोमॅटिक स्पॅम कॉल ब्लॉकिंग सारख्या फीचर्समुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून त्यावर लक्ष केंद्रित करता येईल. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सवर परिणाम होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Apple थर्ड पार्टी अ‍ॅपला कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी देत नाही

जून 2023 मध्ये iPhone यूजर्ससाठी Truecaller Call Recording Feature सुरु करण्यात आलं होतं. हे फीचर युजर्ससाठी सुरुवातीपासूनच पेड होते. तथापि, नंतर ते अँड्रॉइड यूजर्ससाठी पेड करण्यात आले. मात्र Apple कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपला कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी देत नाही. अशावेळी कंपनीला एका अशा लाईनचा वापर करावा लागला जी कॉलमध्ये विलीन करता येऊ शकते. काबरा यांनी म्हटलं आहे की या पद्धतीमुळे त्यांच्यासाठी केवळ समस्या निर्माण तसेच यासाठी मोठा खर्च देखील करावा लागला. याच सर्वाचा विचार करून आता हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

युजर्सना मिळाली नोटिफिकेशन

X प्लॅटफॉर्मवर अनेक ट्रूकॉलर यूजर्सना एक नोटिफिकेशन शेयर करण्यात आली आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ‘आम्ही आयफोनसाठी ट्रूकॉलरवरील कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद करत आहोत.’ एका पॉप-अप मॅसेजमध्ये युजर्सना याबाबत सूचना देण्यात आली आहे. या सूचनेमध्ये सांगण्यात आलं आहे की, जे युजर्स वारंवार कॉल रेकॉर्डिंग फीचरचा वापर करत आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. युजर्सनी त्यांचे रेकॉर्डिंग डाउनलोड करावे, कारण 30 सप्टेंबरनंतर तुमचा सर्व डेटा अ‍ॅपनधून डिलीट केला जाणार आहे. युजर्स काही सोप्या स्टेप्स फॉलो करून कॉल रेकॉर्डिंग डाऊनलोड करू शकतात.

Free Fire Max: Garena ने गेमर्सना दिलं खास गिफ्ट, धमाकेदार Rewards साठी जारी केले स्पेशल रेडिम कोड्स

कॉल रेकॉर्डिंग सेव्ह करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या आयफोनवर Truecaller अ‍ॅप ओपन करा आणि रेकॉर्ड बटनावर क्लिक करा
  • आता सेटिंग आयकॉनवर टॅप करा आणि स्टोरेज प्रेफरेंस ऑप्शनवर क्लिक करा
  • ते iCloud स्टोरेजमध्ये बदला.
  • जर हा पर्याय बंद असेल तर सेटिंग्जमध्ये जा. नावावर क्लिक करा.
  • आता iCloud मध्ये सेव्ह केलेले Truecaller चालू करा. हे वैशिष्ट्य चालू करण्याचा हा मॅन्युअल मार्ग आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

नकुल काबरा कोण आहेत?
ट्रूकॉलरचे ios प्रमुख

आयफोन युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंग फीचर कधी बंद होणार?
30 सप्टेंबर 2025

Web Title: Iphone users will not able to use truecaller call recording feature after 30 september 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर
1

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी
2

Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी

Year Ender 2025: Gemini AI मुळे वर्षाचा शेवट होणार आणखी खास, सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे खास फोटो
3

Year Ender 2025: Gemini AI मुळे वर्षाचा शेवट होणार आणखी खास, सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे खास फोटो

Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह
4

Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.