iQOO 15: 7000mAh बॅटरी आणि लेटेस्ट Snapdragon प्रोसेसर... iQOO च्या नव्या 5G स्मार्टफोनचा कॅमेरा आहे जबरदस्त
iQOO चा नवीन स्मार्टफोन अखेर आता चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा नवीन पावरफुल फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 15 या नावाने चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन अनेक दमदार स्पेसिपिकेशन्स आणि पावरफुल डिझाईनसह लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक एडवांस फीचर्स देण्यात आले आहेत. हा नवीन स्मार्टफोन पाच वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे.
Diwali 2025: दिवाळीत फटाक्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचाय? या टिप्स तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर
या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर iQOO च्या डिवाइसमध्ये 6.85 इंच 2K+ कर्व्ड सॅमसंग M14 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिवाइस HDR10+, 144Hz रिफ्रेश रेट आणि Dolby Vision सह लाँच करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 6000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
फोनमध्ये सर्वात पावरफुल Snapdragon 8 Elite Gen 5 (3nm) चिपसेट ऑफर केलं जात आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये Adreno 840 GPU आणि Q3 गेमिंग चिप देखील घेण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 12GB/16GB LPDDR5X Ultra Pro RAM आणि 256GB ते 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन लेटेस्ट Android 16 बेस्ड OriginOS 6.0 ने सुसज्ज आहे.
iQOO 15 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हे डिवाइस 50MP चा Sony सेंसर वाला प्राइमरी कॅमेरा ऑफर करतो. यासोबतच या डिवाइसमध्ये 50MP 150° अल्ट्रा-वाइड लेंस आणि 50MP 3x पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील देण्यात आला आहे, स्मार्टफोनच्या पुढील बाजूस 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. .(फोटो सौजन्य – X)
एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ही मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 100W अल्ट्रा-फास्ट फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह येते. या स्मार्टफोनमध्ये 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याचा अर्थ पण काही मिनिटातच फुल चार्ज केला जाऊ शकतो.
Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर
iQOO 15 च्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4199 युआन म्हणजेच सुमारे 51,780 रुपये ठेवण्यात आली आहे. iQOO 15 च्या 16GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4499 युआन म्हणजेच सुमारे 55,480 रुपये ठेवण्यात आली आहे. iQOO 15 च्या 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4699 युआन म्हणजेच सुमारे 57,945 रुपये ठेवण्यात आली आहे. iQOO 15 च्या 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4999 युआन म्हणजेच सुमारे 61,660 रुपये ठेवण्यात आली आहे. iQOO 15 च्या 16GB + 1TB (Honor of Kings Edition) स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 5499 युआन म्हणजेच सुमारे 67,830 रुपये ठेवण्यात आली आहे.
या डिव्हाईसची विक्री चीनमध्ये सुरु झाली आहे. तर या डिव्हाईसच्या Wilderness कलर व्हेरिअंटची विक्री 31 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हे डिव्हाइस नोव्हेंबरमध्ये भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच होणार आहे, ज्यामुळे ते आयक्यूओचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन बनेल.