Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर
दिवाळी हा रंग, उत्साह आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घरात दिवे, रांगोळी आणि हसत असलेले चेहरे पाहायला मिळतात. हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करावे असं प्रत्येकाला असं वाटत असतं. परंतु बऱ्याचदा कमी प्रकाशामुळे किंवा जलद हालचालींमुळे, फोटो अस्पष्ट किंवा फिकट होतात. असे फोटो पाहून अनेकांना राग येतो. जर तुम्हालाही तुमचे दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर वेगळे दिसावेत असे वाटत असेल, तुम्हाला देखील वाटत असेल की तुमचा फोटो परफेक्ट असावा, तुम्हाला देखील वाटत असेल की तुमचा फोटो आकर्षक असावा तर आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे फोटो आणखी आकर्षक बनतील आणि हे फोटो पाहून सर्वच म्हणतील वाह, काय फोटो आहे!
Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय
फोटो क्लिक करण्यापूर्वी तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेरा लेंस माइक्रोफाइबर कपड्याने साफ करा. लेंसवर असलेली धूळ किंवा बोटांचे निशान फोटोची क्वालिटी खराब करते. अशावेळी साफ लेंसद्वारे फोटोचे डिटेल्स आणि ब्राइटनेस दोन्ही अधिक चांगले दिसतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
दिवाळीची खरी सुंदरता प्रकाशात लपलेली असते. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रयत्न करा की, तुम्ही नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून चांगले फोटो क्लिक करू शकता. जर तुम्ही बाहेरील ठिकाणी शूट करत असाल सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी फोटो क्लिक करा. यावेळी योग्य प्रकाशात तुम्ही अगदी चांगला फोटो क्लिक करू शकता. जर तुम्ही खोलीत फोटो क्लिक करत असाल तर दिवे आणि दिव्यांकडे असा अँगल करा की प्रकाश चेहऱ्यावर पडेल.
फक्त क्लिक करण्याऐवजी, थोडा विचार करून फोटो फ्रेम करणे चांगले, ज्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल. Rule of Thirds चा वापर करा म्हणजेच ऑब्जेट फ्रेमच्या मधोमध ठेऊ नका. फ्रेममध्ये दिव्यांच्या रांगा किंवा रांगोळीचे पॅटर्न समाविष्ट करा, यामुळे फोटोमध्ये खोली वाढेल.
स्क्रीनवर टॅप करून ऑब्जेट करून फोकस सेट करा आणि एक्सपोजर एडजस्ट करा. ज्यामुळे प्रकाश योग्य प्रकारे सेट होईल. जर तुम्ही फोनमध्ये प्रो मोडचा वापर करत असाल तर मॅनुअल कंट्रोल्सचा वापर करा.
दिवाळीच्या रात्री Night Mode, Portrait Mode आणि Pro Mode चा वापर नक्की करा. Night Mode चा वापर करून कमी प्रकाशात चांगले फोटो कॅप्चर केले जाऊ शकतात. Portrait Mode चा वापर करून बॅकग्राऊंट ब्लर केले जाऊ शकते.
लोक हसत असताना, बोलत असताना आणि आनंद साजरा करतानाचे क्षण टिपा. हे उत्स्फूर्त, अचानक घडणारे क्षण बहुतेकदा सर्वोत्तम फोटो बनवतात.
फोटो एडिट करताना कलर्स, कॉन्ट्रास्ट आणि शार्पनेस एडजस्ट करा. तुमचे एडिटिंग नैसर्गिक दिसत आहे याची खात्री करा. खूप जास्त फिल्टर किंवा जास्त एडिट केलेले फोटो कृत्रिम दिसतात.