Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!

AnTuTu बेंचमार्किंगच्या एप्रिल 2026 रँकिंगमध्ये iQOO 15 Ultra ने अव्वल स्थान पटकावत सर्वांचे लक्ष वेधले आहे. दमदार परफॉर्मन्स आणि उच्च स्कोअरमुळे हा स्मार्टफोन सध्या जगातील सर्वात ताकदवान अँड्रॉईड डिव्हाईस ठरला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2026 | 10:53 AM
AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!

AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!

Follow Us
Follow Us:
  • iQOO 15 Ultra ने 41 लाखांहून अधिक स्कोअर मिळवत AnTuTu मध्ये नंबर 1 स्थान मिळवलं.
  • टॉप 10 यादीत अनेक फ्लॅगशिप फोनना मागे टाकत iQOO ने बाजी मारली.
  • दमदार चिपसेट आणि 16GB RAM मुळे हा फोन परफॉर्मन्समध्ये आघाडीवर आहे.
Android Smartphones AnTuTu Score: बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म AnTuTu ने एप्रिल 2026 च्या लेटेस्ट अँड्रॉईड (Android) स्मार्टफोन्सची रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये एका चिनी कंपनीच्या फोनने बाजी मारली आहे. या स्मार्टफोनने वनप्लस, शाओमी, रियलमी, ओप्पो, Huawei सारख्या सर्व ब्रँड्सच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना मागे टाकलं आहे. या फोनला AnTuTu बेंचमार्किंगवर सर्वात जास्त स्कोर मिळाला आहे. हा फोन कोणता आहे, तुम्हाला माहिती आहे का? अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या iQOO च्या नव्या फोनने ही कामगिरी केली आहे. हा फोन आहे iQOO 15 Ultra. या लेटेस्ट लाँच फोनला AnTuTu बेंचमार्किंगवर सर्वात जास्त गुण मिळाले आहेत.

काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

ठरला सर्वात दमदार फोन

AnTuTu ने एप्रिल महिन्यातील 10 सर्वात पावरफुल फोन्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये iQOO 15 Ultra (16GB + 1TB) ने अव्वल स्थान पटकावले आहे. या फोनला सर्वाधिक 41,26,940 गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या स्थानी iQOO 15 (16GB + 1TB) असून या फोनला 41,02,621 गुण मिळाले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स पवरफॉर्मंसच्या बाबतीत सर्वोत्तम ठरले आहेत.  (फोटो सौजन्य – iQOO) 

AnTuTu V11 Performance Ranking of April 2026 is out. 🔸Flagship
👑 iQOO 15 Ultra
Snapdragon 8 Elite Gen5 🐉
🔸Sub-Flagship
👑 iQOO Z11
MediaTek Dimensity 8500 Full Power Version
🔸Android Pad
Vivo Pad 6 Pro
Snapdragon 8 Elite Gen5 🐉#Antutu #iQOO15Ultra #iQOOZ11 pic.twitter.com/fufvCz7dkQ
— Tech Home  (@TechHome100) May 3, 2026

बेंचमार्कवर 40,98,742 गुणांसह Red Magic 11 Pro+ (24GB + 1TB) तिसऱ्या स्थानावर आहे. Realme GT8 Pro (16GB + 512GB) चौथ्या स्थानावर असून या फोनला 39,68,443 गुण मिळाले आहेत. या यादीमध्ये Oppo Find X9 Ultra (16GB + 512GB) पाचव्या स्थानी असून त्याला 39,41,792 गुण मिळाले आहेत. हा स्मार्टफोन अद्याप भारतात लाँच करण्यात आला नाही. कंपनी फोन भारतात लवकरात लवकर लाँच करण्यासाठी तयारी करत आहे. OnePlus Ace 6 Ultra (16GB + 1TB) ला 39,38,102 गुण मिळाले असून हा फोन सहाव्या स्थानी आहे.

सातव्या स्थानी Red Magic 8 Pro स्मार्टफोन असून त्याला 38,10,592 गुण मिळाले आहेत. आठव्या स्थानी Red Magic 8 आहे, त्याला 38,08,833 गुण मिळाले आहेत. 37,97,824 गुणांसह Vivo X300 Ultra नवव्या स्थानावर आहे. हे सर्व स्मार्टफोन्स 16GB रॅम+ 512GB स्टोरेजसह उपलब्ध आहेत. OnePlus 15T (16GB + 512GB) दहाव्या स्थानी असून त्याला 37,93,016 गुण मिळाले आहेत.

Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर

iQOO ने मारली बाजी

मिड बजेट सेगमेंटमध्ये iQOO बाजी मारली आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच 2K (1,440×3,168 पिक्सेल) सॅमसंग M14 8T एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले दिला आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये ऑक्टा कोर 3nm स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे.

Web Title: Iqoo 15 ultra tops antutu rankings worlds most powerful android smartphone revealed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
1

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
3

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?
4

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.