Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिपस्टर Rincon de Mellis ने कथित गुगल पिक्सेल 11 प्रो आणि पिक्सेल 11 प्रो एक्सएल चे काही डिटेल्स शेअर केले आहेत. यावेळी कंपनीच्या फोनमध्ये काही सामान्य बदल पाहायला मिळू शकतात, ज्यामध्ये पूर्णपणे ब्लॅक कॅमेरा मॉड्यूल मिळण्याची शक्यता आहे. तथापी, यावेळी दोन्ही डिव्हाईसमध्ये नवीन Tensor G6 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे, ज्याला 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या 3एनएम-आधारित टेन्सर जी5 प्रोसेसरच्या तुलनेत, 2एनएम प्रक्रियेमुळे परफॉर्मंस आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
पिक्सेल 11 सिरीजमधील एक खास गोष्ट म्हणजे पिक्सेल ग्लो. आगामी सिरीजमध्ये पिक्सेल ग्लो हे एक नवीन एलईडी नोटिफिकेशन लाईट फीचर असणार आहे. यामुळे डिव्हाईसची मागील बाजू उजळू शकते. पिक्सेल 11 सिरीजमधील हे फीचर ‘नथिंग’च्या ‘ग्लिफ लाईट्स’सारखे असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुगल पिक्सेल 11 प्रो मध्ये 6.3-इंच LTPO डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. तर पिक्सेल 11 प्रो एक्सएल मध्ये 6.8-इंच डिस्प्ले मिळू शकतो. यासोबतच दोन्ही डिव्हाईसमध्ये सॅमसंगचा नवीन M16 OLED पॅनल मिळू शकतो. एवढंच नाही तर दोन्ही डिव्हाईसमध्ये अंडर-डिस्प्ले फेस आयडी देखील मिळण्याची शक्यता आहे. नेहमीच्या फेस अनलॉकच्या विपरीत, यामध्ये ॲपलच्या फेस आयडीसारखी प्रणाली वापरली जाऊ शकते.
Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी ‘या’ फोल्डेबल फोनला करणार ‘Good Bye’? कारण काय? जाणून घ्या
यावेळी गुगल पिक्सेल 11 प्रो आणि पिक्सेल 11 प्रो एक्सएल मध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये एक 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 48-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि एक 48-मेगापिक्सेलचे 5x टेलीफोटो लेंस मिळू शकते. दोन्ही मॉडेल्समध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पासून सुरू होऊन 1TB पर्यंतचे बेस स्टोरेज असेल. गूगल या वर्षी ऑगस्टमध्ये पिक्सेल 11 सिरीज सादर करेल अशी अपेक्षा आहे.






