
iQOO 15 vs OnePlus 15R: बेस्ट कॅमेऱ्याची निवड करावी की बॅटरी किंगची वाट पाहावी? कोण आहे खरा चॅम्पियन? जाणून घ्या
Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
iQOO 15 मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर दिला आहे. iQOO चा हा लेटेस्ट लाँच स्मार्टफोन त्याच्या गेमिंग परफॉर्मेंससाठी ओळखला जातो आणि यामध्ये Q3 गेमिंग चिप दिली आहे, ज्यामुळे फोन आणखी स्मूथ चालतो. जर तुम्ही गेमर असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. OnePlus 15R या आगामी स्मार्टफोनचे काही फीचर्स लीक झाले आहे. ज्यामध्ये सांगितलं आहे की, Snapdragon 8 Gen 5 दिला जाऊ शकतो. हा देखील पावरफुल आहे. मात्र ‘Elite’ मॉडेलच्या तुलनेत याची पीक परफॉर्मेंस थोडी कमी असू शकते. (फोटो सौजन्य – X)
iQOO 15 मध्ये मागील बाजूस 3 कॅमेरे दिले आहे आणि तिन्ही कॅमेरे 50MP (मेन + अल्ट्रावाइड + पेरिस्कोप टेलीफोटो) आहेत. याचा 100x झूम आणि पोर्ट्रेट मोड याला एक परफेक्ट कॅमेरा बनवतो. रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 15R मध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप (50MP मेन + 8MP अल्ट्रावाइड) दिला जाऊ शकतो. यामध्ये टेलीफोटो लेंस (झूम कॅमेरा) ची कमतरता असू शकते.
iQOO 15 मध्ये 7,000mAh ची मोठी बॅटरी आहे जी 100W चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच OnePlus 15R मध्ये यावेळी दमदार बॅटरी परफॉर्मन्स ऑफर केला जाणार आहे. आगामी OnePlus मॉडेल 7,800mAh किंवा 8,000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
iQOO 15 मध्ये 6.85-इंच 2K Curved OLED डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनची कर्व्ड स्क्रीन प्रीमियम अनुभव देते आणि व्हिडिओ पाहण्याची मज्जा दुप्पट करते. OnePlus 15R मध्ये 1.5K Flat डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. ज्या गेमर्सना कर्व्ड स्क्रीन नको असते, त्यांच्यासाठी OnePlus चा फ्लैट पॅनल जास्त फायदेशीर ठरणार आहे.
जर तुम्हाला बेस्ट कॅमेरा, उत्तम झूम आणि पोर्ट्रेट पाहिजे आहे, त्यांच्यासाठी iQOO 15 बेस्ट आहे. या स्मार्टफोनचा प्रीमियम कर्व्ड डिस्प्ले युजर्सना आकर्षित करतात. गेमर्ससाठी हा स्मार्टफोन बेस्ट ठरणार आहे. ज्यांचे बजेट 50 ते 60 हजार रुपयांच्या दरम्यान आहे, अशा लोकांसाठी OnePlus 15R हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये अशी बॅटरी दिली जाणार आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत टिकू शकते, असा दावा केला जात आहे. हा स्मार्टफोन फ्लॅट स्क्रीनने सुसज्ज असणार आहे.
Ans: iQOO गेमिंग आणि हाय-परफॉर्मन्सवर फोकस करतो, तर OnePlus बॅलन्स्ड परफॉर्मन्स आणि फ्लॅगशिप अनुभव देते.
Ans: OnePlus मध्ये कॅमेरा ट्यूनिंग आणि कलर सायन्स चांगले असते. iQOO कॅमेरा चांगला असला तरी तो परफॉर्मन्सवर जास्त लक्ष देतो.
Ans: iQOO मध्ये अनेकवेळा 120W / 200W फास्ट चार्जिंग, तर OnePlus मध्ये 80W / 100W फास्ट चार्जिंग मिळते.