Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर
अनेकदा आपण नकळतपणे अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनवर परिणाम होतो. विशेषत: अत्यंत थंड वतावरणात आपल्या स्मार्टफोनचा चुकीचा वापर तुमचा डेटा धोक्यात आणू शकतो. हिवाळ्यात स्मार्टफोनचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
हिवाळ्यात ज्याप्रमाणे वातावरणातील तापमान कमी होते, त्याचप्रमाणे फोनचे इंटरनल तापमान देखील अत्यंत वेगाने कमी होते.
थंड वातावरणातून तुम्ही फोनला अचानक एखाद्या गरम खोलीत घेऊन गेलात तर अचानक तापमान बदलल्यामुळे फोनवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे फोनमध्ये ओलावा जमा होतो, ज्यामुळे बॅटरी, प्रोसेसर आणि स्टोरेज चिपचे नुकसान होते. या ओलाव्यामुळे कधीकधी डेटा करप्ट होऊ शकतो आणि फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स डिलीट होऊ शकतात.
कमी तापमानात फोन चार्ज करणं धोकादायक मानलं जातं. थंडीत लिथियम-आयन बॅटरीमध्ये रासायनिक क्रिया अत्यंत स्लो होते. ज्यामुळे चार्जिंग योग्य पद्धतीने होत नाही. जर तुमचा फोन खूप थंड असेल आणि तुम्ही त्याला लगेच चार्जिंगला लावला तर यामुळे फोनची बॅटरी सेल खराब होऊ शकते आणि फोन अचानक बंद होऊन तुमच्या फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स करप्ट होऊ शकतात.
हिवाळ्यात ग्लव्स घालून फोनचा वापर करणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे असे अनेक लोकंं असतात जे हिवाळ्यात फोनला कोणतीही सुरक्षा देत नाहीत. मात्र अधिक थंड स्क्रीनमुळे टच सेंसिटिविटीवर परिणाम होऊ शकतो. कधीकधी फोन फ्रीज होतो आणि चुकीच्या कमांड मिळतात, याचा परिणाम म्हणजे अॅप्स क्रॅश होतात आणि सिस्टम फाइल्स करप्ट होऊ शकतात, ज्यामुळे सर्व डेटा धोक्यात येतो.
थंडीत फोनची बॅटरी इतर दिवसांपेक्षा अधिक वेगाने संपते. जर फोन सतत बंद-चालू होत असेल तर याचा परिणाम इंटरनल स्टोरेजवर होतो. अशा परिस्थितीत फाईल्स सिस्टिम करप्ट होण्याची शक्यता अधिक वाढते. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावर काम करत असाल आणि फोन अचानक बंद झाला तर तुमचा संपूर्ण डेटा डिलीट होऊ शकतो.
Ans: हिवाळ्यात लिथियम-आयन बॅटरीचे परफॉर्मन्स कमी होते आणि फोन ऑटोमॅटिक शटडाउन होऊ शकतो.
Ans: अत्यंत कमी तापमानामुळे बॅटरी, स्क्रीन आणि इंटरनल पार्ट्सना नुकसान होऊ शकते.
Ans: यामुळे आंतरिक ‘कंडेन्सेशन’ तयार होऊन सर्किट्सला नुकसान होऊ शकते.






