
राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
Xiaomi चा धुमाकूळ! 7900mAh बॅटरीसह नवा Redmi M100 लाँच, किंमत फक्त 22 हजारांपासून
चीनमध्ये हा नवीन स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 20,400 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 31,200 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 35,500 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 41,200 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन स्नो व्हाइट, डार्क रॉक ब्लॅक आणि फ्लोटिंग लाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. ग्राहक हा स्मार्टफोन विवो चीनच्या ई-स्टोअरवरून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
iQOO Z11S मध्ये 6.83-इंच ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2800×1260-पिक्सेल रेजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि सपोर्टेड गेम्समध्ये 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट ऑफर करतो. हा एचडीआर, P3 वाइड कलर गॅमट आणि फुल-ब्राइटनेस डीसी डिमिंगला सपोर्ट करतो. फोन 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेल्या मीडियाटेक डायमेन्सिटी 7500 फुल-पावर वर्जन चिपसेटवर चालतो, ज्याला Mali G625 जीपीयू सोबत जोडण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स डुअल-चॅनल रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चर आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मुख्य कॅमेरा 10x डिजिटल झूमपर्यंत सपोर्ट करतो आणि 4K रेजोल्यूशनपर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.05 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो फुल-फोकस ऑपरेशनला सपोर्ट करतो आणि 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.
कनेक्टिविटीसाठी iQOO Z11S मध्ये 5G, 4G, 2.4GHz आणि 5GHz बँड्सवर Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, ओटीजी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टची सुविधा देण्यात आली आहे. फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि फेशियल रिकग्निशन फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये प्लॅस्टिक मिड-फ्रेम आणि कंपोजिट बॅक पॅनल दिले आहे. यासोबतच धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग दिली आहे.