iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल
आयक्यूओओ चा नवीन स्मार्टफोन भारतात 28,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरल्यास 1,500 रुपयांचे डिस्काउंट मिळणार आहे. तसेच हा स्मार्टफोन 6 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शनवर देखील खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने सांगितलं आहे की, स्मार्टफोनची विक्री 14 सप्टेंबरपासून ॲमेझॉनवर सुरु होणार आहे. प्रीस्टमॅटिक ग्रीन आणि टाइटन ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: iQOO)
आयक्यूओओ झेड 11 एक्स ए 5G स्मार्टफोनमध्ये 6.76-इंच (1,080×2,344 पिक्सेल) एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1,200 निट्सची आहे. या फोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे. या फोनमध्ये एआय गेम व्हॉइस चेंजर आणि 4 डी गेम व्हायब्रेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
आयक्यूओओ झेड 11 एक्स ए 5G स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅमला सपोर्ट करतो. यासोबतच सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी लेटेस्ट लाँच फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
आयक्यूओओने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि बायपास चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.






