Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghibli मुळे तुमची ओळख चोरली जातेय का? अब्जावधी डॉलर्समध्ये बाजारात विकला जातोय तुमचा चेहरा? काय होणार याचे परिणाम?

जेव्हा आपण सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतो किंवा अ‍ॅप्सना कॅमेरा अ‍ॅक्सेस देतो तेव्हा आपण अनेकदा त्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम असा की AI कंपन्या आपल्या चेहऱ्याचे अद्वितीय परिमाण स्कॅन करतात आणि स्टोर करतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 31, 2025 | 11:46 AM
Ghibli मुळे तुमची ओळख चोरली जातेय का? अब्जावधी डॉलर्समध्ये बाजारात विकला जातोय तुमचा चेहरा? काय होणार याचे परिणाम?

Ghibli मुळे तुमची ओळख चोरली जातेय का? अब्जावधी डॉलर्समध्ये बाजारात विकला जातोय तुमचा चेहरा? काय होणार याचे परिणाम?

Follow Us
Close
Follow Us:

चॅटजीपीटी 40 ने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कारण चॅटजीपीटीमध्ये तयार केल्या जाणाऱ्या Ghibli ईमेजने सर्वांना वेड लावला आहे. सर्व सोशल मीडियांवर Ghibli ईमेजने धुमाकूळ घातला आहे. लोकं स्वत:ची, त्याच्या मित्र – मैत्रिणींची, कुटूंबाची Ghibli ईमेज तयार करत आहेत. Ghibli ईमेज तयार करण्यासाठी चॅटजीपीटीसह अनेक AI चा वापर केला जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Ghibli ईमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो AI सोबत शेअर करावा लागतो. पण AI आपल्या फोटोचा गैरवापर करत आहे का?

मज्जाच मज्जा! Sam Altman चा ChatGPT युजर्सना अखेर दिलासा, फ्रीमध्ये Ghibli-Style ईमेज क्रिएट करण्याची दिली परवानगी

AI सोबत फोटो शेअर करणं किती सुरक्षित

मागील काही घटनांचा विचार केला तर अशी देखील प्रकरण समोर आली आहेत, जिथे लोकांच्या फोटोंवरून त्यांची ओळख चोरून ती विकण्यात आली आहे. त्यामुळे सध्या Ghibli ईमेजने लोकांना कितीही वेड लावलं असलं तरी त्याचा वापर किती योग्य आणि सुरक्षित याबाबत शंकाच आहे. फेसबुक असो, इंस्टाग्राम असो किंवा एक्स, लोक त्यांचे Ghibli ईमेज सर्वत्र शेअर करत आहेत. लोक Ghibli ईमेज तयार करण्यासाठी केवळ AI सोबत स्वतःचे फोटो शेअर करत नाहीत तर ते त्यांच्या कुटुंबांचे, अगदी लहान मुलांचेही फोटो शेअर करत आहेत. पण लोकांना माहिती नाही की, असे करून ते केवळ त्यांच्या फोटोंचा डेटा AI कंपन्यांसोबत शेअर करत नाहीत तर नकळत त्यांचे चेहऱ्याची ओळख देखील त्यांना देत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

ओळख चोरी

Ghibli ईमेज तयार करण्यासाठी AI सोबत फोटो शेअर केला म्हणजे तुमची ओळख चोरली जाते, असं नाही. आपण वेगवेगळ्या कामासांठी आपला चेहरा आणि आपले फोटो AI सोबत शेअर करतो. पण या सर्व गोष्टींमुळे तुमच्या चेहऱ्याची ओळख चोरली जात आहे का, या सर्व गोष्टी किती सुरक्षित आहेत, हे तपासून पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण Ghibli मुळे आपण आपली चेहऱ्याची ओळख AI कंपन्यांना देत आहोत. ही गोष्ट फार साधी वाटत असेल, पण त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. तुमच्या चेहऱ्याची ओळख चोरीला जाणं हे पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबरपेक्षा जास्त धोकादायक आहे कारण तुम्ही ते बदलू शकता पण जर तुमचा चेहरा चोरीला गेला तर तुम्ही तो बदलू शकत नाही.

काय होती जुनी घटना

क्लियरव्ह्यू AI वाद हा असाच एक प्रसंग होता. खरं तर, क्लिअरव्ह्यू AI वर सोशल मीडिया, न्यूज साइट्स आणि सार्वजनिक रेकॉर्डमधून परवानगीशिवाय 3 अब्ज फोटो चोरून आणि ते पोलीस आणि खाजगी कंपन्यांना विकून डेटाबेस तयार केल्याचा आरोप होता. याव्यतिरिक्त, मे 2024 मध्ये, ऑस्ट्रेलियन कंपनी आउटाबॉक्सचा डेटा लीक झाला ज्यामध्ये 1.05 दशलक्ष लोकांचे चेहरे स्कॅन, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पत्ते चोरीला गेले. हा डेटा ‘हॅव्ह आय बीन आउटबॉक्स्ड’ नावाच्या साइटवर पोस्ट करण्यात आला होता. पीडितांनी चुकीची ओळख, छळ आणि ओळख चोरीची तक्रार केली. एकदा चोरीला गेल्यावर, तुमचा डेटा काळ्या बाजारात विकला जातो, ज्यामुळे सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड किंवा डीपफेक तयार करणे यासारखे घोटाळे होतात.

ओळख चोरीचा धोका वाढला आहे

स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, 2025 मध्ये फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी (FRT) ची बाजारपेठ 5.73 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि 2031 पर्यंत 16.79 टक्के CAGR सह 14.55 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मेटा आणि गुगल सारख्या कंपन्यांवर युजर्सचे फोटो वापरून त्यांच्या AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्याचा आरोप आहे, असं देखील सांगण्यात आलं होतं. PimEyes सारख्या साइट्स कोणालाही त्यांच्या फोटोवरून ऑनलाइन शोधण्याची परवानगी देतात. यामुळे ओळख चोरीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

iPhone च्या कॅमेऱ्याचे हे 5 हिडन फीचर्स युजर्ससाठी ठरतायत वरदान! स्क्रीन ऑफ व्हिडीओ रेकॉर्डिंगसह करता येणार ही कामं

काय आहेत उपाय

हे सर्व धोके टाळण्यासाठी तुमच्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे कोणत्याही टूलचा वापर करताना काळजी घेणं. आपण AI सोबत फोटो शेअर करतोय पण यामुळे आपल्याला भविष्यात कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही ना याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुमची एक चूक तुमच्या भविष्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. सोशल मीडियावर उच्च-रिझोल्यूशनचे फोटो अपलोड करणे टाळा. फेस अनलॉकऐवजी पिन किंवा पासवर्ड वापरा. याशिवाय, तुमचा बायोमेट्रिक डेटा कसा वापरला जात आहे हे सांगण्यासाठी सरकार आणि कंपन्यांवर दबाव आणला पाहिजे. यामध्ये सरकारचे महत्त्वाचे काम म्हणजे फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाच्या बेकायदेशीर वापरावर बंदी घालणं.

Web Title: Is ghibli try to stolen your identity is your identity getting sell in market what will be the consequences tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.