Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करणं किती सुरक्षित? काय सांगतात एक्स्पर्ट्स? जाणून घ्या

स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी तुम्ही देखील लॅपटॉप चार्जरचा वापर करताय का? तुम्ही वापरत असलेली पद्धत खरंच सुरक्षित आहे का? यामुळे स्मार्टफोनचा परफॉर्मंस आणि बॅटरीवर परिणाम होऊ शकतो का? जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2026 | 06:10 AM
Tech Tips: लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करणं किती सुरक्षित? काय सांगतात एक्स्पर्ट्स? जाणून घ्या

Tech Tips: लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करणं किती सुरक्षित? काय सांगतात एक्स्पर्ट्स? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • फोन चार्जर नसताना लॅपटॉप चार्जर वापरता? या गोष्टी माहित असणं गरजेचं
  • 65W किंवा 100W चार्जरने फोन चार्ज केल्यास नुकसान होते का? जाणून घ्या
  • लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करणे सुरक्षित आहे का? तज्ज्ञ काय सांगतात
अनेकदा असं होतं की आपल्या स्मार्टफोनची चार्जिंग संपते आणि फोन चार्ज करण्यासाठी आपल्याकडे चार्जर देखील नसतो. अशावेळी आपण लॅपटॉपची मदत घेतो. म्हणजेच लॅपटॉप चार्जरच्या मदतीने आपण आपला स्मार्टफोन चार्ज करतो. ही प्रोसेस जरी सोपी वाटत असली तरी सुरक्षित आहे का? यामध्ये तुमचा फोन पूर्णपणे सुरक्षित राहतो की तुमच्या फोनला नुकसान होऊ शकते? याबद्दल तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया.

भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण

सध्याच्या डिजिटल काळात अनेक डिव्हाईस यूएसबी-सी आणि यूएसबी पावर डिलिव्हरी टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. याचा अर्थ असा आहे की, फोन आणि चार्जर कनेक्ट होऊन ठरवू शकतात की किती पावर घ्यायची आहेत. जेव्हा तुम्ही तुमचा फोन लॅपटॉपच्या चार्जरला जोडता तेव्हा डिवाइस स्वतः त्याच्या गरजेनुसार पावर शोषूण घेते. तुमचा चार्जर जास्त पावरवाला असला तरी देखील तुमचा फोन तेवढीच ऊर्जा शोषून घेणार आहे ज्याची त्याला गरज आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉपने फोन चार्ज करणे सुरक्षित आहे का?

लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करण्याची पद्धत अतिशय सुरक्षित मानली जाते. मात्र यासाठी तुमचा फोन आणि चार्जर दोन्हीमध्ये यूएसबीसी पावर डिलिव्हरी सपोर्ट असणं अत्यंत गरजेचा आहे. ज्यामुळे चार्जिंगदरम्यान विजेचे योग्य संतुलन टिकून राहते आणि तुमचा फोन ओवरचार्ज होत नाही. याशिवाय नेहमी चांगल्या ब्रँडचे आणि चांगल्या क्वालिटीची केबल्स वापरणं सर्वात गरजेचं आहे. खराब आणि स्वस्त केबल्समुळे चार्जिंगमध्ये समस्या येऊ शकते. याशिवाय डिव्हाईस खराब होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात असते. सध्याचे स्मार्टफोन्स अशा पद्धतीने डिझाईन केले जातात की ते जास्त वॅटवाल्या चार्जरपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतात. यासाठी 65W किंवा 100W लॅपटॉपच्या रिचार्जने फोन चार्ज केल्यास कोणत्याही धोका नसतो.

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! हा आहे कंपनीचा 72 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे

लॅपटॉप चार्जरमुळे फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो का?

चार्जरच काम केवळ बॅटरीपर्यंत पावर पोहोचवण्याचे आहे. याचा स्मार्टफोनची स्पीड किंवा परफॉर्मन्ससोबत थेट कोणताही संबंध येत नाही. तसेच प्रोसेसरवर, रॅम किंवा ॲप्सच्या परफॉर्मन्सवर याचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच चार्जिंग दरम्यान फोन गरम होत असेल तर हिट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला फोनची जागा बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही एक अतिशय सामान्य प्रक्रिया आहे आणि यामध्ये घाबरण्याची कोणतीही गरज नाही. लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करण्याची प्रक्रिया जरी सुरक्षित आणि सोपी असली तरी देखील काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. फोन चार्ज करताना नेहमी चांगल्या ब्रँडचे केबल्स वापरा. जर तुम्ही योग्य केबल आणि योग्य डिव्हाईसचा वापर करत असाल तर तुमच्या फोनवर कोणताही परिणाम होत नाही.

Web Title: Is it safe to charge a phone with a usb c laptop charger know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 06:10 AM

Topics:  

  • laptop
  • smartphone
  • smartphone charger

संबंधित बातम्या

अखेर तो क्षण आलाच! पावरफुल फीचर्ससह Google Pixel 11 Pro Fold ची भारतात एंट्री, डिझाईन पाहताच यूजर्स झाले घायाळ
1

अखेर तो क्षण आलाच! पावरफुल फीचर्ससह Google Pixel 11 Pro Fold ची भारतात एंट्री, डिझाईन पाहताच यूजर्स झाले घायाळ

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत
2

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर
4

टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.