
यूजर्सच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! अनोख्या डिझाईनसह Motorola Signature 27 ची दमदार एंट्री; फीचर्स पाहताच म्हणाल, कमालच.....
कंपनीने त्यांचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन मोटोरोला सिग्नेचर 27 जागतिक बाजारात 1,599 यूरो म्हणजेच सुमारे 1.70 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. हे डिव्हाईस कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. ग्राहक हा स्मार्टफोन पॅन्टोन कॅप्युलेट ऑलिव्ह आणि पॅन्टोन कोल स्मोक या रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Motorola)
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच एक्सट्रीम अमोलेड ड्युओ एलटीपीओ टँडम ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे, तर पीक ब्राइटनेस 12,000 निट्सपर्यंत जाऊ शकते. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास सिरॅमिक 3 चा वापर करण्यात आला आहे. फोन ग्राफीनओएस (अँड्रॉईड 17) वर चालते. कंपनीने असा दावा केला आहे की, या स्मार्टफोनमध्ये यूजर्सना सात वर्षांपर्यंत ओएस अपगरेड आणि सात वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, अधिक चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी, यात बँग अँड ओलुफसेन द्वारे ट्यून केलेले स्टिरिओ स्पीकर्स दिले आहेत.
दमदार परफॉर्मंससाठी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2nm टेक्नोलॉजीनवर चालतो. यामध्ये 5.01GHz पर्यंत क्लॉक स्पीडवाले दोन प्राइम कोरसह तीन परफॉर्मेंस कोर आणि तीन एफिशिएंसी कोर मिळणार आहेत. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये ॲड्रेनो 850 जीपीयू देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज पर्याय मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूला तीन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी एलवायटी-910 प्रायमरी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा मिळणार आहे. याशिवाय डिव्हाईसमध्ये 200 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे, जो 100x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करतो. यामध्ये एक वेगळे एक्शन सेंसर देखील देण्यात आले आहे. या फोनद्वारे 30fps वर 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे शक्य आहे.
मोटोरोला सिग्नेचर 27 मध्ये 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळणार आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये MIL-STD-810H मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी देखील देण्यात आली आहे.
Ans: मोटोरोला सिग्नेचर 27 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला असून, भारतातही याच महिन्यात लाँच होणार आहे.
Ans: या स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमधील किंमत 1,599 युरो म्हणजेच अंदाजे 1.70 लाख रुपये आहे.
Ans: या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच एक्सट्रीम AMOLED ड्युओ LTPO टँडम OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.