JioHotstar: हॉटस्टार आणि जिओ सिनेमा युजर्सचं जुनं सबस्क्रिप्शन सुरू राहणार, की पुन्हा भरावे लागणार पैसे? जाणून घ्या
रिलायन्सने त्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्म JioCinema आता Disney+ Hotstar मध्ये विलीन केलं आहे. त्यामुळे आता दोन्ही प्लॅटफॉर्मच्या विलीनीकरणानंतर JioHotstar नावाचं एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आलं आहे. कंपनीने गेल्या वर्षी स्टारचे इंडिया ऑपरेशन्स खरेदी केले होते. JioHotstar या नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मवर युजर्सना JioCinema आणि Disney+ Hotstar या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मचा कंटेट एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे युजर्सना नवीन ओटीटी अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.
नव्या रुपात लाँच झाला Redmi चा ‘हा’ पावरफुल 5G स्मार्टफोन! AI कॅमेरा आणि बरचं काही.. किंमत केवळ इतकी
पण आता JioCinema आणि Disney+ Hotstar या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युजर्सना पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता त्यांना नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करावा लागणार कि त्यांच्या JioCinema आणि Disney+ Hotstar च्या जुन्या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये नवीन ओटीटी कंटेटचा आनंद घेता येणार? जर नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करावा लागणार असेल तर Hotstar आणि Jio Cinema च्या जुन्या सबस्क्रिप्शनचे काय होणार? आता आम्ही तुम्हाला तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्या युजर्सकडे आधीच जिओ सिनेमा किंवा Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कंपनीने म्हटले आहे की युजर्स आपोआप नवीन प्लॅटफॉर्मवर स्विच केले जातील. त्यामुळे त्यांना वेगळे अॅप डाऊनलोड करण्याची किंवा त्यांचा जुना सबस्क्रिप्शन प्लॅन अॅक्टिव्ह असताना नवीन प्लॅन खरेदी करण्याची गरज लागणार नाही.
युजर्सना नवीन प्लॅटफॉर्मवर लॉगिन करताच, त्यांना त्यांचे सबस्क्रिप्शन अॅक्टिव्ह करण्याचा पर्याय मिळेल. याचा अर्थ असा की युजर्सना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता JioHotstar सबस्क्रिप्शन मिळेल. त्याचप्रमाणे, ज्या युजर्सकडे जिओ सिनेमा सबस्क्रिप्शन आहे त्यांचे JioHotstar सबस्क्रिप्शन देखील सक्रिय केले जाईल.
जर तुम्हाला JioHotstar चे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर त्याची किंमत 149 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय, या प्लॅटफॉर्मवरील कंटेंट सबस्क्रिप्शनशिवाय देखील पाहता येतो. पण यामध्ये युजर्सना जाहिराती देखील दाखवल्या जाणार आहेत. JioHotstar वर सबस्क्रिप्शनशिवाय प्रीमियम कंटेंट देखील उपलब्ध आहे. सबस्क्रिप्शनसोबतच, युजर्सना कंपनीकडून अतिरिक्त फायदे देखील दिले जातील.
रिलायन्सच्या नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म JioHotstar वर युजर्सना अधिक प्रगत अनुभव दिले जातील. या प्लॅटफॉर्ममध्ये 4K स्ट्रीमिंग, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आणि चांगला यूजर इंटरफेस यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. विलीनीकरणानंतर, आता युजर्सना जिओ सिनेमा आणि डिस्ने+ हॉटस्टारच्या एकत्रित कंटेंट लायब्ररीमध्ये प्रवेश उपलब्ध असेल.
JioHotstar मध्ये, युजर्सना 10 भारतीय भाषांमध्ये वेगवेगळ्या शैलीतील कंटेंट पाहता येईल. यामध्ये चित्रपट, शो, अॅनिमे, वेब सिरीज, लाईव्ह क्रीडा आणि इतर कार्यक्रमांचा समावेश आहे. यासोबतच, कंपनीचे म्हणणे आहे की युजर्सना या प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय प्रीमियर देखील पाहण्याची संधी मिळेल. यासोबतच, JioHotstar ने आंतरराष्ट्रीय सामग्रीसाठी डिस्ने, एनबीसीयुनिव्हर्सल पीकॉक, वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी एचबीओ आणि पॅरामाउंटसोबत भागीदारी केली आहे.