नव्या रुपात लाँच झाला Redmi चा 'हा' पावरफुल 5G स्मार्टफोन! AI कॅमेरा आणि बरचं काही.. किंमत केवळ इतकी
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi इंडियाने त्यांच्या पावरफुल 5G स्मार्टफोनचा नवीन व्हेरिअंट भारतात लाँच केला आहे. Xiaomi इंडियाने Redmi Note 14 5G चा नवीन कलर व्हेरिअंट भारतात लाँच केला आहे. कंपनीने हा फोन आयव्ही ग्रीन रंगात लाँच केला आहे. या फोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच, या डिव्हाइसमध्ये, वापरकर्त्यांना AI कॅमेरा आणि AMOLED डिस्प्ले यासारखे अनेक फीचर्स मिळणार आहेत. हा स्मार्टफोन वापरताना युजर्सना एक प्रिमियम अनुभव मिळणार आहे.
Mumbai Tech Week च्या तारखा जाहीर, या दिवशी होणार आशियातील सर्वात मोठा AI ईव्हेंट! वाचा वेळापत्रक
Redmi Note 14 5G हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील त्याचा लूक आणि स्पेसिफिकेशन्स अगदी कमाल आहे. या स्मार्टफोन्समध्ये असे अनेक फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. चला तर मग या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)
Redmi Note 14 5G मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 2100 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. त्याचे ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स उच्च-रिझोल्यूशन ऑडिओ सपोर्टसह येतात, ज्यामुळे मूवी, म्यूजिक आणि कॉलिंगचा अनुभव आणखी चांगला होतो. स्मार्टफोनची एर्गोनॉमिक डिझाइन, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि प्रीमियम बिल्ड यामुळे Redmi Note 14 5G दैनंदिन वापरासाठी एक उत्तम पर्याय बनतो.
A touch of nature, a dash of style.
Introducing the all-new #RedmiNote14 5G in Ivy Green—here to make a statement. 💚Buy now: https://t.co/0xM0aC69eN pic.twitter.com/beHKaqIRyh
— Redmi India (@RedmiIndia) February 14, 2025
या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, Redmi Note 14 5G मध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 8 एमपीचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे, जो वाइड अँगल शॉट्ससाठी सर्वोत्तम मानला जातो आणि क्लोज-अप फोटोग्राफीसाठी मॅक्रो लेन्स सर्वोत्तम मानला जातो. डिव्हाइसमधील कॅमेरा सेटअप AI Bokeh आणि Dynamic Shots सारख्या वैशिष्ट्यांसह फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला करतो.
पॉवरसाठी, डिव्हाइसमध्ये 5110mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Redmi Note 14 5G च्या नवीन कलर व्हेरिअंटच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये आहे आणि 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या नवीन कलर व्हेरिअंटची विक्री सुरु झाली आहे.
युजर्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइट (Mi.com) वरून फोनचा नवीन आयव्ही ग्रीन व्हेरिअंट खरेदी करू शकतात. याव्यतिरिक्त, युजर्सना ICICI, HDFC, J&K बँक आणि SBI च्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,000 रुपयांची त्वरित सूट देखील मिळेल. त्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.