JioHotstar Subscription Plans: 'हे' आहेत जिओहॉटस्टारचे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स, फायदेही कमाल; जाणून घ्या सविस्तर JioHotstar Subscription Plans: 'हे' आहेत जिओहॉटस्टारचे बेस्ट सबस्क्रिप्शन प्लॅन्स, फायदेही कमाल; जाणून घ्या सविस्तर
रिलायन्स जिओची कंपनी JioCinema आणि ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar यांनी विलीनीकरण केलं आहे. या दोन्ही कंपन्याच्या विलीनीकरण नंतर आता JioHotstar नावाचा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना JioCinema आणि Disney+ Hotstar या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहता येईल. यासोबतच प्रेक्षकांना लाईव्ह स्पोर्ट्स देखील पाहता येतील.
यापूर्वी JioCinema आणि Disney+ Hotstar हे दोन्ही वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून लाँच करण्यात आले होते, पण आता त्यांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किंमतीत देखील बदल झाला आहे. येथे आम्ही तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किंमती आणि त्यांच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – X)
JioHotstar सध्या सर्व वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. तथापि, काही काळानंतर वापरकर्त्यांना प्रीमियम कंटेंट आणि ॲड फ्री एक्स्परसिन्ससाठी सबस्क्रिप्शन खरेदी करावं लागेल. त्यामुळे सध्या JioHotstar ने तीन प्रमुख सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केले आहेत. युजर्स चित्रपट, शो, वेब सिरीज आणि काही मर्यादित कंटेंट कोणताही खर्च न करता पाहू शकतील. यासाठी त्यांना प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवल्या जातील.
JioHotstar मोबाईल प्लॅन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅनचा 149 रुपयांचा सबस्क्रिप्शन प्लॅन 3 महिन्यांची व्हॅलिडिटी देतो. यासोबतच, हा प्लॅन 499 रुपयांमध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी देतो. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 720p (HD) कंटेंट क्वालिटी दिली जाते. यामुळे, वापरकर्ते फक्त एकाच मोबाईलमध्ये या प्लॅनचा आनंद घेऊ शकतील. JioHotstar च्या या प्लॅनमध्ये जाहिराती दाखवल्या जाणार आहे.
JioHotstar सुपर प्लॅन 299 रुपयांमध्ये 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देते. या प्लॅनच्या वार्षिक योजनेसाठी 899 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये, 1080p (फुल एचडी) गुणवत्तेची सामग्री उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये, युजर्स कोणत्याही दोन डिव्हाइसवर (मोबाइल, टीव्ही किंवा वेब) JioHotstar पाहू शकतील. ही योजना जाहिरातींद्वारे समर्थित आहे.
JioHotstar प्रीमियम प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 299 रुपये प्रति महिना आहे. यासोबतच, वार्षिक प्लॅन 1499 रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. या प्लॅनच्या कंटेंट क्वालिटीबद्दल बोलायचे झाले तर, ते 4K (2160p) + डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते. युजर्स 4 डिव्हाईसवर या योजनेचा वापर करू शकतील. या योजनेला जाहिरातींचा आधार नाही. त्यामुळे तुम्ही जाहिरातीशिवाय सिनेमा, वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता. तथापि, लाईव्ह स्पोर्ट्समध्ये वापरकर्त्यांना जाहिराती दाखवल्या जातील.