
Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
स्मार्टफोनचा वापर करताना होम स्क्रीनवर कोणताही ॲप ओपन न करता फुल स्क्रीन जाहिरात दिसत असेल तर हे धोक्याचे संकेत असू शकतात. एखाद्या संशयास्पद ॲप, ब्राऊझर नोटिफिकेशन किंवा ॲडवेअरमुळे अशी समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत मोबाईलमधील ॲप्स आणि सेटिंग तपसाणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणताही ॲप ओपन केला नसेल आणि तरी देखील तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर जाहिराती दिसू लागल्या तर… हा एक धोक्याचा संकेत असू शकतो. अनेकदा काही ॲप्स स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर अशी समस्या पाहायला मिळू शकते. त्यामुळे जर नुकताच तुम्ही कोणता ॲप डाऊनलोड केला असेल आणि त्यानंतर तुम्हाला स्मार्टफोनमध्ये अशी समस्या जाणवू लागली असेल तर त्वरित संबंधित ॲप फोनमधून डिलीट करा. यानंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करायला विसरू नका.
काही वेबसाईट्स आणि ॲप्स नोटिफिकेशनद्वारे वारंवार जाहिराती पाठवतात. जर मोबाईलच्या नोटिफिकेशन पॅनलमध्ये वारंवार अनोळखी ऑफर्स आणि जाहिराती दिसत असतील तर सर्वात आधी या नोटिफिकेशन कोणत्या ॲप्सवरून पाठवल्या जात आहेत, याची माहिती मिळवा. यानंतर संबंधित ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन बंद करा.
जर तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर वारंवार जाहिराती दिसत असतील तर फोनमधील संशयास्पद ॲप्स किंवा थर्ड पार्टी लाँचर तपासा. मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन अलीकडेच इंस्टॉल करण्यात आलेले ॲप्स तपासा. संशयास्पद ॲप्स डिलीट करा.
फोनचा ब्राउझर आपोआप उघडू लागला किंवा अनोळखी वेबसाइट्सवर रीडायरेक्ट केले जात असेल, तर ब्राउझरची साइट सेटिंग्ज आणि नोटिफिकेशन परवानग्या तपासा. अनोळखी वेबसाइट्ससाठीच्या परवानग्या तात्काळ रद्द करा आणि तुमचा ब्राउझिंग डेटा साफ करा. कोणत्याही संशयास्पद पॉप-अपवर क्लिक करू नका.