
Flipkart-Amazon सेलमधून खरेदी केलेला iPhone बनावट तर नाही? घरबसल्या अशी करा तपासणी, फॉलो करा या स्टेप्स
मोबाईलची पॅकेजिंग आणि डिव्हाईसचे बाहेरील डिझाईन पाहून, आयफोन खरा आहे की बनावट हे ओळखणं फार अवघड आहे. त्यामुळे तुम्ही सेलमधून खरेदी केलेला आयफोन खरा आणि की बनवाट हे ओळखण्यासाठी काही दुसऱ्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
तुम्ही खरेदी केलेला आयफोन खरा आहे की बनवाट हे तपासण्यासाठी त्याचा आयएमईआय नंबर तपासा. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि जनरलवर क्लिक करून अबाऊट पर्याय निवडा. इथे तुम्हाला आयएमईआय नंबर दिसेल. तसेच तुम्ही फोनवर *#06# डायल करून देखील आयएमईआय नंबर तपासू शकता. यानंतर बॉक्सवर लिहीलेला आयएमईआय नंबर तपासा. दोन्ही नंबर वेगळे असतील तर फोनच्या ऑथेंटिसिटी आणि सेलसंबंधित डिटेल्स तपासा.
फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन जनरल आणि त्यानंतर अबाऊट सेक्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला सिरीअल नंबर दिसेल. यानंतर ॲपलच्या अधिकृत चेक कव्हरेज वेबसाईटवर जा आणि इथे सिरीअल नंबर एंटर करा. यानंतर तुमच्यासमोर डिव्हाईसची सर्व माहिती दिसू लागेल. ही माहिती काळजीपूर्वक तपासून घ्या.
खऱ्या आयफोनमध्ये ॲपलची अधिकृत आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम पाहायला मिळते. तसेच, फोनमध्ये ॲप स्टोअर, ॲपल अकाऊंट आणि आयओएस सॉफ्टवेअर अपडेट सारखे पर्याय पाहायला मिळतील. तसेच तुम्ही गरज असल्यास ॲपल सपोर्ट किंवा सर्विस सेंटरमधून देखील तपासू शकता की तुम्ही खरेदी केलला आयफोन खरा आहे की, बनवाट. लक्षात ठेवा की, केवळ फोनची डिझाईन आणि मागील बाजूला असलेला ॲपल लोगो पाहून आयफोन खरा आहे की बनावट हे ठरवू शकत नाही.
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करताना सेलरचे डिटेल्स, प्रोडक्ट डिटेल्स आणि रिटर्न पॉलिसी तपासा. डिलीव्हली मिळाल्यानंतर इनवॉइस सुरक्षित ठेवा आणि फोनचे पॅकेजिंग आणि सील तपासा. शक्य असल्यास, पॅकेज उघडताना व्हिडिओ रेकॉर्ड करा. ज्यामुळे काही गडबड झाल्यास तुमच्याकडे पुरावा असेल.