वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले... नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
आयटेल एसीई 4 शाइन फीचर फोन भारतात 1,059 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक, मॅजिक ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: Itel)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या आयटेल फीचर फोनमध्ये 1.77-इंच क्यूक्यूव्हीजीए कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 128×160 पिक्सेल आहे. या फोनमध्ये कंपनीने कर्व्ड बॉडी आणि टेक्स्चर फिनिश आणि रेडिएंट कीपॅड दिला आहे. नव्या आयटेल एसीई 4 शाइनमध्ये लार्ज-फ्रंट डायलर दिला आहे. या फीचर फोनमध्ये 1000mAh बॅटरी दिली आहे आणि चार्जिंगसाठी टाईप-सी पोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी आयटेल एसीई 4 शाइन फोनमध्ये डुअल सिम आणि 900/1800MHz बँड 2G नेटवर्कचा सपोर्ट देण्यात आला आहे.
नव्या आयटेल फोनमध्ये ब्लूटूथ, वायरलेस एफएमसह रेकॉर्डिंग आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळणार आहे. या फोनमध्ये हिंदी, गुजराती, तेलुगू, पंजाबी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली यासारख्या भारतीय भाषांचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ऑटो रेकॉर्डिंगसह एसओएस फीचर देखील मिळणार आहे. यूजर्स फोनमध्ये 500 कॉन्टॅक्ट फोटोसह सेव्ह करू शकतात.
आयटेलने लाँच केलेल्या लेटेस्ट फीचर फोनमध्ये यूनिसोकSC6533G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 4MB रॅम आणि 8MB चे स्टोरेज मिळणार आहे. या फोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतनीने 32 जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. या सर्वांसह कंपनीच्या नव्या फीचर फोनमध्ये म्यूजिक आणि व्हिडीओ प्लेयर, एफएम, फाइल मॅनेजर, कॅलेंडर, अलार्म, कॅलकुलेशन, टॉर्च आणि कार्लकेयरचा सपोर्ट देखील मिळणार आहे,






