फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear... जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
सॅमसंगने लाँच केलेल्या या स्मार्ट चश्म्यांमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन AR 1 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये एका बाजूला 12 मेगापिक्सेलचा एचडीआर कॅमेरा मिळणार आहे, जो 3:4 रेशियोमध्ये फोटो क्लिक करू शकतो. यामुळे3K रेजोल्यूशनवर 30fps पर्यंत आणि HDR सपोर्टसह 2K व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील केली जाऊ शकते.
याशिवाय या डिव्हाईसमध्ये डुअल ओपन-ईअर स्पीकर आणि चार मायक्रोफोन देण्यात आले आहेत. चश्म्यामध्ये 2GB रॅम आणि 64GB चे इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकदा चार्ज केल्यानंतर हे डिव्हाईस 9 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करू शकते. तर चार्जिंग केससह या डिव्हाईसची बॅटरी लाईफ 72 तासांपर्यंत असू शकते. (फोटो सौजन्य: Samsung)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या चश्म्यांचा वापर गॅलेक्सी एस, गॅलेक्सी एस एफई आणि गॅलेक्सी झेडएन सिरीजमधील One UI 9.0 किंवा नव्या वर्जनने सुसज्ज असलेल्या स्मार्टफोनसोबत केला जाऊ शकतो. याशिवाय, अँड्रॉईड 17 किंवा नवीन वर्जन असलेले गूगल पिक्सेल 7 आणि नवीन मॉडेल देखील या डिव्हाईससोबत काम करू शकतात. तसेच, आयफोन 13 आणि त्यानंतरच्या ज्या मॉडेलमध्ये iOS 26.6 किंवा नवीन वर्जन आहे, अशा मॉडेलसोबत चश्म्यांचा वापर केला जाऊ शकतो.
सॅमसंग इंटेलिजेंट आयवेअरची किंमत डिझाईन आणि ब्रँडिंगच्या हिशोबाने ठरवण्यात आली आहे. वॉर्बी पार्कर मॉडेलची सुरुवातीची किंमत 395 डॉलर म्हणजेच सुमारे 37,000 रुपये आहे. तर जेंटल मॉन्स्टर मॉडेलची सुरुवातीची किंमत 449 डॉलर म्हणजेच सुमारे 42,000 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या टॉप मॉडेलची किंमत 489 डॉलर म्हणजेच सुमारे 46,000 रुपये आहे. यूजर्स हे नवीन सॅमसंग डिव्हाईस संबंधित ब्रँडच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्समधून खरेदी करू शकतील. याव्यतिरिक्त, 10 डिसेंबरपासून सॅमसंगच्या निवडक स्टोअर्समध्ये प्रत्यक्ष अनुभव (हँड्स-ऑन डेमो) घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. त्याच दिवशी डिव्हाईसची विक्री देखील सुरु होणार आहे.
Ans: सॅमसंग इंटेलिजेंट आयवेअर हे स्मार्ट चष्मे आहेत. यामध्ये रोजच्या चष्म्याचा लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची स्मार्ट फीचर्स एकत्र देण्यात आली आहेत.
Ans: सॅमसंगने जेंटल मॉन्स्टर (Gentle Monster) आणि वॉर्बी पार्कर (Warby Parker) यांच्या सहकार्याने हे स्मार्ट चष्मे तयार केले आहेत.
Ans: या स्मार्ट चष्म्यांमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन एआर 1 जन 1 चिपसेट देण्यात आला आहे.






