itel Super 26 Ultra: 15 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले वाला फोन, 6 वर्षांपर्यंतचा स्टेबल परफॉर्मेंस...
itel Super 26 Ultra याच आठवड्यात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये एक बजेट स्मार्टफोन म्हणून लाँच केला आहे. हा एक नवीन हँडसेट आहे, ज्यामध्ये कंपनीने 6.78-इंच 1.5K 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह अनेक दमदार फीचर्स दिले आहे. कंपनीने या बजेट स्मार्टफोनमध्ये Unisoc T7300 चिपसेट, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. itel Super 26 Ultra चार कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6,000mAh बॅटरी देखील दिली आहे. यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच itel Super 26 Ultra चा लुक Samsung Galaxy S25 सीरीजसोबत प्रचंड जुळतो.
iPhone Air: कोण आहे अबिदुर चौधरी? ज्याने तयार केला सर्वात पातळ iPhone, फार रंजक आहे कहाणी
itel Super 26 Ultra आता नाइजीरियामध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या या बजेट स्मार्टफोनची ऑफिशियल सेल 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कंपनीने itel Super 26 Ultra हा बजेट स्मार्टफोन बेज, ब्लू, गोल्ड आणि ग्रे या कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे. बांग्लादेशातील MobileDokan वेबसाइटवरील लिस्टिंगनुसार, itel Super 26 Ultra च्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत BDT 19,990 म्हणजेच सुमारे 14,900 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत BDT 21,990 म्हणजेच सुमारे 15,900 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
itel Super 26 Ultra मध्ये 6.78-इंच 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देण्याक आले आहे आणि यामध्ये ‘रेन-प्रूफ’ फीचर देखील आहे. ज्यामुळे ओल्या स्क्रीनवर देखील फोनचा वापर केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 6nm Unisoc T7300 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअपबाबत बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देण्यात आल आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे. या हँडसेटला IP65 रेटिंग देण्यात आली आहे, जो डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंटसाठी आहे.
itel Super 26 Ultra बाबत कंपनीने असा दावा केला आहे की, हा स्मार्टफोन 6 वर्षांपर्यंतचा ‘स्टेबल’ परफॉर्मेंस देणार आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये NFC, Wi-Fi, Bluetooth आणि एक इन्फ्रारेड (IR) ट्रांसमीटर यांचा समावेश आहे. ज्याच्या मदतीने होम अप्लायंसेस नियंत्रित करता येतात. फोनमध्ये AI कॅमेरा इरेजर, सर्कल टू सर्च आणि आयटेलचा इन-हाऊस AI असिस्टंट Sola सारखे AI फीचर्स देखील आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. त्याची जाडी 6.8mm आहे.