Jio-Airtel-Vi यूजर्सच्या खिशाला पुन्हा बसणार फटका! रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
भारतातील टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोबाईल युजर्सना पुन्हा एकदा फटका बसणार असण्याची शक्यता आहे. यावेळी रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 12 टक्के वाढ होणार असल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मे महिन्यात मोबाईल युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या संख्येत वाढ झाल्याने आता पुन्हा रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोबाईल युजर्सना फटका बसणार आहे. असं सांगितलं जात आहे की, भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio-Airtel-Vi त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 12 टक्के वाढ करू शकतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा अशा ग्राहकांवर परिणाम होणार आहे, जे वर्षभरासाठी त्यांचा फोन रिचार्ज करतात. या माहितीनंतर तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आता पुन्हा एकदा युजर्स मोठ्या संख्येने त्यांचे नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट करू शकतात. गेल्यावर्षी देखील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर मोठ्यां संख्येने युजर्सनी त्यांचा नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट केला होता.
यावर्षी मे महिन्यात युजर्सची संख्या 74 लाखांनी वाढली आहे. ही खूप चांगली प्रगती मानली जात आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 29 महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. मे महिन्यात झाालेल्या या वाढीनंतर, अॅक्टिव युजर्सची संख्या 108 कोटींवर पोहोचली आहे. अहवालानुसार, गेल्या 5 महिन्यांत युजर्सची संख्या सतत वाढत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्यात मोबाईल युजर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. ब्रोकरेज कंपनी जेफरीजच्या मते, युजर्समध्ये वाढ झाल्यामुळे एअरटेल आणि जिओसारख्या कंपन्यांना मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवण्याची संधी मिळाली आहे. परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे Vi चे युजर्स सतत कमी होत आहेत, अशा परिस्थितीत एअरटेल आणि जिओला अधिक फायदा होईल. Vi चे युजर्स कमी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे रिचार्ज प्लॅनची जास्त किंमत आणि कमी फायदे. जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत Vi त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अत्यंत कमी फायदे ऑफर करते. याशिवाय या प्लॅनमध्ये ओटीटी फायदे देखील कमी आहेत. त्यामुळे Vi युजर्सची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
सुरुवातीला युजर्सना जिओकडून खूप चांगले नेटवर्क मिळत होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क खूप खराब आहे. ज्यामुळे युजर्सना डेटा वापरण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय, एअरटेलची सेवा आता पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे. त्यामुळे जिओ आणि व्हिआयचा विचार केला तर त्यांना आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.