सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक नवीन गॅझेट्सचा शोध लावण्यात आला आहे. खरं तर हे शोध लोकांच्या भल्यासाठी लावण्यात आले आहेत. मात्र स्कॅमर्स याचा गैरफायदा घेत आहेत. लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी स्कॅमर्स टेक्नोलॉजीचा वापर करून नवीन पद्धती शोधत आहेत. ओटीपी स्कॅम आणि फ्रॉड लिंकबाबत तर सर्वांनाच माहिती आहे. पण आता एका नव्या स्कॅमबाबत माहिती समोर आली आहे. हा नवा स्कॅम म्हणजे स्क्रीन मिररिंग फ्रॉड. या स्कॅममध्ये केवळ बँकिंग आणि UPI च नाही तर तुमची वैयक्तिक माहिती देखील स्कमर्सपर्यंत अगदी सहज पोहोचू शकते. तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाण्याची देखील शक्यता आहे.
केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर
खरं तर स्क्रीन मिररिंग एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन TV, लॅपटॉप किंवा इतर कोणत्या डिव्हाईसवर शेअर करू शकता. मात्र आता स्कॅमर्स या फीचरचा गैरफायदा घेत आहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांची माहिती चोरण्यासाठी या फीचरचा वापर केला जात आहे. स्कॅमर्स तुम्हाला फेक अॅप किंवा खोट्या लिंक पाठवतात, तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या फोनमध्ये स्क्रीन मिररिंग अॅप डाऊनलोड होतो. एकदा अॅप डाऊनलोड झाला की स्कॅमर्ससमोर तुमच्या मोबाईलची संपूर्ण स्क्रिन ओपन होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्कॅमर्स स्वत:ला कस्टमर केयर एग्जीक्यूटिव किंवा बँक अधिकारी असल्याचे भासवतात. स्कॅमर्स तुम्हाला सांगतात की या अॅपमुळे तुमच्या अनेक समस्या सोडवू शकता. एकदा अॅप डाऊनलोड झालं की तुमच्याकडे स्क्रीन मिररिंगची परवानगी मागितली जाते. तुम्ही परवानगी दिल्यानंतर तुमच्या मोबाईलची स्क्रीन स्कॅमर्ससमोर ओपन होते आणि तुमची सर्व माहिची स्कॅमर्सकडे जाते. यामुळे स्कॅमर्स ओटीपी, यूपीआय, पिन, पासवर्ड, बँकिंग अॅप्स, गॅलरी आणि संपर्कांमध्ये देखील प्रवेश करा.
एकंदरीत, स्क्रीन मिररिंग फसवणूक ही एक नवीन प्रकारची डिजिटल फसवणूक आहे जी तुमच्या निष्काळजीपणाचा फायदा घेऊन तुमचे बँक खाते काही मिनिटांत रिकामे करू शकते. सावधगिरी बाळगा आणि कोणत्याही कॉल किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका.