Jio Hotstar यूजर्सची मज्जाच मज्जा! आज फ्री मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन, फक्त करावं लागणार हे कामं
शुक्रवारी आज संपूर्ण भारतात 79 वा स्वातंत्र्यता दिवस साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यता दिनानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, कॉलेज, सोसायटी सर्वत्र आज ध्वजारोहण केलं जात आहे. भारताच्या 79 वा स्वातंत्र्यता दिनानिमित्त अनेक कंपन्यांनी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यासोबत आता आणखी एक लोकप्रिय कंपनी Jio Hotstar देखील त्यांच्या युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे.
15 ऑगस्ट निमित्ताने रिलायंसचे ओटीटी प्लेटफॉर्म Jio Hotstar एक खास ऑफर घेऊन आले आहे. 15 ऑगस्ट रोजी सर्व युजर्ससाठी Jio Hotstar सबस्क्रिप्शन फ्री असणार आहे. 15 ऑगस्ट निमित्ताने Jio Hotstar युजर्सना हे खास गिफ्ट देण्यात आलं आहे. ज्यामुळे युजर्स Jio Hotstar वरील सर्व कंटेट फ्रीमध्ये पाहू शकणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी, युजर्स जिओ हॉटस्टारवरील सर्व कंटेंट मोफत पाहू शकतील, अशी घोषणा कंपनीने केली आहे. या ऑफरबाबत अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
Jio Hotstar ने युजर्ससाठी एक खास गिफ्ट आणलं आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, स्वतंत्र्यता दिनानिमित्त या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेट युजर्सना फ्रीमध्ये पाहता येणार आहे. Jio Hotstar ने ही ऑफर त्यांच्या वेबसाईट आणि अॅपवर देखील टिझ केली आहे. या ऑफरसह Proud Indian Proudly Free अशी टॅगलाईन देखील देण्यात आली आहे. या बॅनरवर फ्री असं स्पष्टपणे लिहीलं आहे. याचा अर्थ असा की तुमचे जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन संपले असले तरीही, तुम्ही 15 ऑगस्ट रोजी प्रीमियम कंटेंट मोफत पाहू शकता.
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी जियो हॉटस्टार यूजर्सना मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर लॉगिन करावं लागणार आहे. अलिकडेच जिओवर ‘सालाकर’ ही देशभक्तीपर वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. भारतीय गुप्तहेरावर आधारित ही वेब सिरीज पाकिस्तानमध्ये मोफत पाहता येईल. त्यामुळे आता जिओ युजर्सची मज्जा होणार आहे.
जियो हॉटस्टारच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सना कोणत्याही सब्सक्रिप्शनची आवश्यकता नाही. फ्री अॅक्सेससाठी युजर्सना डिव्हाईसवरून लॉगिन करावं लागार आहे. लक्षात ठेवा की, 15 ऑगस्टनंतर, तुम्हाला प्रीमियम कंटेंटसाठी जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन खरेदी करावे लागेल.
Jio Hotstar अॅक्टिव्ह युजर्स किती आहेत?
503 मिलीयन
कोणत्या टॅगलाईनसह जारी केला टिझर?
Proud Indian Proudly Free
पेड युजर्सची संख्या किती आहे?
280 मिलीयन