
JioHome Diwali Offer: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळी आली की सगळ्यांना काहीतरी भेट हवी असते. यावेळी जिओने आपल्या जिओहोम ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस, आणि त्याच दिवशी जिओने ही ऑफर जाहीर केली आहे.JioHome Diwali Offer:
तुम्ही 10 महिन्यांचा रिचार्ज केला तर तुम्हाला 5 महिने एकदम फुकट मिळणार. म्हणजे पैसे 10 महिन्यांचे भरायचे आणि नेट वापरायचं 15 महिने. असं कुठे मिळतं?
जिओने आपल्या एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. जिओहोम वापरणाऱ्या लोकांना आता 5 महिन्यांची सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहे. पण ही ऑफर आपोआप मिळणार नाही. तुम्हाला ती स्वतः क्लेम करावी लागणार आहे.
आजकाल घरात सगळ्यांना हाय स्पीड नेट लागतं. मुलांना अभ्यासाला, मोठ्यांना ऑफिसच्या कामाला आणि संध्याकाळी टीव्ही, चित्रपट बघायला. सणाच्या दिवसात जर नेट बंद पडलं तर किती त्रास होतो. म्हणूनच जिओने सांगितलं आहे की सणात ग्राहकांना कोणताही जास्त खर्च न करता चांगलं मनोरंजन मिळावं म्हणून ही ऑफर आणली आहे. फक्त एक मिस्ड कॉल द्या, काम झालंही ऑफर घ्यायला कोणतीही मोठी प्रक्रिया नाही. फॉर्म भरायचा नाही, दुकानात जायची गरज नाही.
Jio 15 Rupees Plan: मोठ्या फाइल्स डाउनलोड करा बिनधास्त! Jio चा 15 रुपयांचा डेटा पॅक
तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून म्हणजे ज्या नंबरवर जिओहोम आहे त्याच नंबरवरून 8219582195 या नंबरवर एक मिस्ड कॉल द्यायचा आहे. बस, एवढंच.मिस्ड कॉल दिल्यावर जिओकडून तुमच्या नंबरवर एक मेसेज येईल. त्यात पुढे काय करायचं ते सांगितलेलं असेल. ती छोटी प्रक्रिया पूर्ण केली की तुमचे 5 महिने फुकटचे चालू होतील.
जर तुम्हाला 10 महिन्यांचा मोठा रिचार्ज करायचा नसेल तर काळजी करू नका. जिओने छोटा प्लॅनवाल्यांसाठी पण एक ऑफर ठेवली आहे.2 महिन्यांचा प्लॅन घेतला तर 1 महिना फुकट मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 Mbps चा स्पीड मिळतो. याची किंमत 2,122 रुपये आहे.
हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवर जाऊन ‘Claim now’ या बटणावर क्लिक करा.
खरं सांगायचं तर ज्यांचं घरात रोज नेटचं काम असतं त्यांच्यासाठी ही ऑफर एकदम फायद्याची आहे. 10 महिने पैसे भरून 15 महिने नेट वापरणं म्हणजे 5 महिन्यांचे पैसे वाचले. दिवाळीत नवीन कनेक्शन घ्यायचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे.पण एक गोष्ट लक्षात ठेवा. मिस्ड कॉल देण्याआधी तुमचा नंबर जिओहोमला जोडलेला आहे ना हे नक्की बघा. दुसऱ्या नंबरवरून मिस्ड कॉल दिला तर ऑफर मिळणार नाही.
दिवाळीच्या झगमगाटात जिओने ग्राहकांना बचतीची दुहेरी भेट दिली आहे. मोठा रिचार्ज करणाऱ्याला 5 महिने फ्री, आणि छोटा रिचार्ज करणाऱ्याला 1 महिना फ्री. तुम्ही पण जिओहोम वापरत असाल तर ही संधी सोडू नका. आजच तो मिस्ड कॉल द्या आणि 5 महिने फुकट नेटचा आनंद घ्या.
Ans: 10 महिन्यांच्या रिचार्जवर 5 महिने मोफत मिळतात.
Ans: 8219582195 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे.
Ans: जिओहोमशी नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून.