
Jio ग्राहकांसाठी खास रिचार्ज! 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G आणि बरेच फायदे... इतकी आहे व्हॅलिडीटी
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 859 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच, या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. याचा अर्थ संपूर्ण व्हॅलिडीटीदरम्यान यूजर्सना एकूण 168GB डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमीट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. तर पात्र ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. ज्यामुळे स्ट्रिमिंग, गेमिंग आणि सोशल मीडिया वापरण्याची मजा दुप्पट होणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
तसेच, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील ऑफर केले जाणार आहेत. तसेच, या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे मोबाईल सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जाणार आहे. ज्यामुळे तुम्ही प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेब सिरीज आणि इतर कंटेट मोफत पाहू शकता. यासोबतच यूजर्सना या प्लॅनमध्ये जिओएआयक्लाऊड वर 50GB फ्री क्लाऊड स्टोरेज देखील मिळणार आहे.
दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान… या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट
इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये 12 महिन्यांचे कॅनव्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शन देखील मोफत ऑफर केले जाणार आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, याची किंमत 1,590 रुपये आहे. याचा अर्थ असा की, ग्राहकांना फोटो एडिटिंग आणि डिझाइनिंगशी संबंधित विविध प्रीमियम टूल्स मोफत वापरण्याची संधी मिळेल. या जिओ प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही तर इतर अनेक फायदे देखील मिळणार आहे. जिओहॉटस्टारचे मोबाईल सबस्क्रिप्शनमुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वेब सिरीज आणि चित्रपट पाहण्याच आनंद घेता येणार आहे. तर 50GB फ्री क्लाऊड स्टोरेज आणि मोफत कॅनव्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शनमुळे देखील ग्राहकांना फायदा होणार आहे.
Ans: Jio च्या 859 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते.
Ans: या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच 84 दिवसांत एकूण 168GB डेटा मिळतो.
Ans: होय, पात्र ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ मिळू शकतो.