Jio घेऊन आलाय धमाकेदार ऑफर! 343 रुपयांच्या मंथली खर्चात मिळणार ओटीटी आणि अनलिमिटेड 5G ची मजा!
तुम्ही देखील जिओ युजर आहात का? ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने पुन्हा एकदा त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ अनलिमिटेड 5G इंटरनेटच नाही तर ओटीटी प्लॅन्सची मजा देखील मिळणार आहे.
फोनमध्ये गेलं पावसाचं पाणी? थांबा! तुमच्या या चुका ठरतील Dangerous, डिव्हाईस होऊ शकतं खराब
जिओने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम लाइट आणि जिओ हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. एवढंच नाही तर या प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना JioTV आणि Jio Cloud देखील ऑफर केलं जाणार आहे. चला तर मग कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर जिओने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 1029 रुपये आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 84 दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम लाईट आणि जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर केलं जात आहे. यासोबतच प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा दिला जाणार आहे. म्हणजेच युजर्सना रोज 2GB डेटा मिळणार आहे. याशिवाय हा प्लॅन युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. म्हणजेच युजर्स कोणत्याही त्रासाशिवाय कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात.
जिओचा हा जबरदस्त प्लॅन युजर्सना दररोज 100 SMS ऑफर कतो. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील दिला जात आहे. जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे 5G नेटवर्क उपलब्ध असेल, तर तुम्ही या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेऊ शकता. तुमचा डेटा देखील खर्च होणार नाही आणि तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय इंटरनेटचा आनंद घेऊ शकाल.
हा प्लॅन युजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करतो, ज्याची एकूण किंमत 1029 आहे. म्हणजेच यासाठी तुम्हाला रोज 12.25 रुपये खर्च करावी लागतील. जर 28 दिवसांचा विचार केला तर युजर्सना 343 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
काय आहे वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी? फोनच्या बॅटरीसाठी किती फायदेशीर? जाणून घ्या सर्वकाही
जर तुम्ही Amazon Prime ऐवजी Netflix चा आनंद घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी जिओचा दुसरा प्लॅन देखील आहे. या प्लॅनची किंमत 1299 रुपये आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये देखील 1029 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये मोफत 50 GB जिओ एआय क्लाउड स्टोरेज देखील उपलब्ध आहे.