Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio vs Airtel: किंमत एकच पण फायदे वेगळे… व्हॅलिडीटी अन् डेटासह कोण ठरणार खरा किंग? जाणून घ्या

Recharge Plan Comparison: JIO आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. मात्र या दोन्ही रिचार्ज प्लॅन्समधील फायदे वेगळे आहेत. आता कोणती कंपनी जास्त फायदे देते, पाहूया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 15, 2026 | 02:04 PM
Jio vs Airtel: किंमत एकच पण फायदे वेगळे... व्हॅलिडीटी अन् डेटासह कोण ठरणार खरा किंग? जाणून घ्या

Jio vs Airtel: किंमत एकच पण फायदे वेगळे... व्हॅलिडीटी अन् डेटासह कोण ठरणार खरा किंग? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • JIO 349 प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा आणि जेमिनी प्रो सारखे फायदे मिळतात.
  • एअरटेल 349 प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G आणि ॲपल म्युझिकची सुविधा दिली जाते.
  • समान किंमत असूनही दोन्ही प्लॅन्सचे फायदे आणि डेटा ऑफर्स वेगवेगळ्या आहेत.
जिओ आणि एअरटेल या दोन्ही भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्यांचे करोडो यूजर्स आहेत. याच करोडो यूजर्ससाठी कंपनी सतत नवीन रिचार्ज प्लॅन्स घेऊन येत असते. पण आता आम्ही तुम्हाला 349 रुपयांच्या किंमतीच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या त्यांच्या यूजर्सना 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनची किंमत समान असली तरी देखील यामधील फायदे वेगळे आहेत. डेली डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि व्हॅलिडीटीच्याबाबतीत कोणता प्लॅन यूजर्सना जास्तीचे फायदे ऑफर करतो? कोणता प्लॅन यूजर्सना एडिशनल डिजिटल कंटेंट ऑफर करतो? दोन्ही रिचार्ज प्लॅनमधील फायद्यांबाबत आता जाणून घेऊया.

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी

जिओचा 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेली 2GB फास्ट इंटरनेटची सुविधा मिळते. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 56GB डेटा मिळतो. तसेच यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

349 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगव्यतिरिक्त इतर फायदे देखील मिळतात. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना तीन महिन्यांसाठी मोफत जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन आणि 50GB जिओएआय क्लाउड स्टोरेज मिळते. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी 35,100 रुपयांच्या किंमतीचा 18 महीन्यांचा गूगल जेमिनी प्रो प्लॅन देखील ऑफर करते. यामध्ये 5000GB क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना यासांरख्या AI फीचर्सचा समावेश आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये जिओटिव्ही आणि जिओक्लाऊडचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

एअरटेलचा 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

टेलिकॉम कंपनी एअरटेल देखील त्यांच्या यूजर्सना 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. यासोबतच यामध्ये रोज 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. मात्र, कंपनी यूजर्सना 50 रुपये जास्त खर्च करून 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन खरेदी करण्याचा सल्ला देते. एयरटेलच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये फिक्स्ड डेली लिमिटऐवजी अनलिमिटेड डेटा एक्सेस ऑफर केला जातो. 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम आणि 6 महिन्यांपर्यंतचे ॲपल म्युझिक ऑफर केले जाते.

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट?

कोणता प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरणार हे पूर्णपणे तुमच्या गरजांवर अवलंबून असते. जर तुम्हाला चांगली सर्विस, क्लाऊड स्टोरेज किंवा गुगल जेमिनी प्रोचा अ‍ॅक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही जिओ रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता. कारण यामध्ये अधिक चांगले डिजिटल फीचर्स आणि सर्विस ऑफर केली जाते. तर, तुम्हाला जास्त इंटरनेट डेटा आणि एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर तुम्ही एअरटेल रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता.

Web Title: Jio vs airtel in one same price which companies recharge plan give more benefits including data and validity tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • airtel
  • jio
  • recharge plans

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर
2

BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा
3

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ;  299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला
4

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ; 299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.